रायगड किल्ला जतन संवर्धन व पर्यटन विकासाची कामे आराखड्यानुसार विविध टप्प्यावर आहेत. तथापि पर्यटन सुविधा जसे पार्किंग व्यवस्था, पर्यटकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे आदी कामांना प्राधान्य देऊन त्वरीत सुरुवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित यंत्रणांचा गुरुवारी (दि.26) आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला येथील अधीक्षक अभियंता मोहिते, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तसेच विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कामांचा विभागनिहाय आराखडा घेतला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत व त्यांच्या निरीक्षणात करावयाची किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू व स्थळांच्या जतन, संवर्धनाची कामे, तसेच पर्यटक सुविधा, किल्ल्यापर्यंत जाणारे रस्ते, पार्किंग व्यवस्था, आवश्यक त्या ठिकाणी विज जोडण्या, गडावर करावयाच्या कामांसाठी ये जा करणाऱ्या कामगारांची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था या सर्व विषयांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कामांच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.
Post a Comment