श्रीवर्धन (विजय गिरी )आपल्या प्रलंबीत मागण्या व राज्य शासनाच्या
चुकीच्या धोरणाबाबत राज्यातील राज्य परीवहन मंडळाचे कर्मचारी संपावर गेले
आहेत.कामगारांच्या संपाचा तीसरा दिवस संपला तरी कामगारांच्या संपावर समाधान
कारक तोडगा निघाला नसल्याने कामगारांमध्ये राज्य सरकार व परीवहन मंत्री
दिवाकर रावते यांच्या बाबत प्रचंड सतापाचे वातावरण निर्माण झाले
आहे.राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेषाध्यक्ष आम.सुनिल तटकरे दिवाळी
निमित्त श्रीवर्धन दौऱ्यावर आले असता,त्यांनी संपकरी कामगरांची श्रीवर्धन
आगारात जावुन भेट घेतली.या वेळी कामगारांनी आपल्या मागण्यांचा व अन्यायाचा
पाढा आम.सुनिल तटकरे समोर वाचुन न्याय मिळवुन देण्यासाठी साकडे घातले.
कामगारांच्या वेदना जाणुन घेतल्यावर मार्गदर्शन करताना आम.तटकरे म्हणाले
की, परीवहन मंत्री दिवाकर रावते हे स्वताची छबी निर्माण करण्यासाठी
स्वताच्या फोटोची जाहीरात करीत सुटले आहेत. या जाहीरांतीचा खर्च कीत्येक
लाखात आहे. जाहीरात बाजी न करता कामगारांच्या हीतासाठी पैसा वापरला
पाहीजे. संपावर तोडगा काढण्यात परीवहन मंत्री सह राज्य सरकार तीन दिवसात
अपयशी ठरले आहे. राष्ट्र्वादी कांग्रेस पक्षाचे सरकार राज्यात असताना अशी
घटना कधी घडली नाही. आपल्या पक्षाने व आघाडी सरकारने वेळोवेळी कामगारांचे
हित पाहीले आहे.एस.टी कामगारांच्या पाठिशी राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्ष ठाम
असुन ,राज्य सरकार दडपशाही करणार असेल तर पक्षाचा कार्यकर्ता
कामगारासोबत, राहील असा विश्वास कामगारांना दिला.
या वेळी व्यासपीठावर युवानेते अनिकेतभाई तटकरे,राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, उपनगराध्यक्ष जितेंद्र सातनाक,अली कौचाली आदी मान्यवर उपस्थीत होते. पुढे बोलताना आम. तटकरे म्हणाले की, राष्ट्र्वादी काॅंग्रेस आघाडी सरकारच्या काळात आपण उर्जा मंत्री असताना कामगरांचे हिताला प्राधान्य देत कामगारांनी सप पुकारल्याची घटना घडली होती मात्र त्यावेळी आपण कामगारांचा संप एका दिवसात सन्मानाने यशस्वी तोडगा काढुन मिटवला होता.राज्यातील सर्वच सेवा देणाÚया सेवेत उत्तम सेवा देणारे एकमेव मंडळ हे परीवहन मंडळ आहे,याचे सर्व श्रेय कामगांराचे आहे.एस.टि.तोट्यात असताना कामगारांच्या कष्टामुळे मंडळ पुर्ववत आले आहे अशा वेळी मंत्री मेहनत घेत नाहीत,कामगारांच्या परीश्रमामुळेच एस.टि.ला गतवैभव प्राप्त झाले आहे.विलासराव देशमुख परीवहन मंत्री असताना आपण फक्त तालुकाअध्यक्ष होतो तरी मंडळात 150 जणांना नोकरीत सामावुन घेतले होते याची आठवण तटकरेंनी मार्गदर्शनात काढली. दिवाकर रावते हे मंत्री असुन कायदा धाब्यावर बसवुन मंडळाचे अध्यक्ष बनले आहेत.प्रवाशांचे हाल होत आहेत वेळीच गांभीर्याने घ्या,कामगांराच्या यातनांचा अंत पाहु नका,तुमच्या चुकीच्या धोरणामुळेच कामगार संपावर गेले आहेत या वर सन्मानाने तोडगा काढा असा इशारा तटकरे यांनी राज्य सरकारला दिला.कामावर या नाहीतर कारवाई करु असा इशारा राज्य सरकारच्या वतीने कामगारांना दिला जातोय,हे सरकार हिटलरशाही चालवतेय का, कामगारांना दडपण आणण्याचा प्रयत्न सरकार कडुन केला गेला तर राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल अशी ग्वाही कामगारांना आम. तटकरेंनी दिली.तसेच एस.टि,कुणाच्या बापाची नाही,ही सर्व सामान्याची आहे.सर्व कामगार एकसाथ संपावर जातात आणी तीन दिवस उजाडुन देखील तोडगा निघत नाही ही राज्यातील पहीली घटना असुन कामगार संपावर जातात यातच सरकाची प्रतिष्ठा गेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेवुन कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तसेच कामगारांची दिवाळी आनंदात जावु देण्यासाठी सरकारला सदबुध्दी देण्यासाठी पांडुरंगाकडे सोमजाई मातेकडे साकडे घातले.या सदिच्छा भेटित आम.सुनिल तटकरे यांचे स्वागत मोरे यांनी केले तसेच प्रास्तावीक प्रदिप विचारे यांनी केले.या वेळी आपल्या विविध मागण्यांचे निवदेन आम.तटकरे यांच्या कडे कामगार नेत्यांनी दिली.

Post a Comment