रा. जि. प. शाळा चिरगाव - सडकेची वाडी शाळेला ग्रामस्थांकडून संगणक संच भेट

https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/21232101_1993390134271593_537666119563356743_n.jpg?oh=fa2727aef4f50d91980c59f2303024a2&oe=5A16E9F4

म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरगाव - सडकेची वाडी. शालेय बालकांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास होण्यासाठी जय बजरंगबली क्रिकेट संघ आणि बैंजो पथक यांच्या वतीने e -learning शिक्षणासाठी एक computer, प्रिंटर आणि ups भेट देण्यात आले.
डिजिटल काळात संगणकाची अत्यंत गरज आहे हीच गरज ओळखून जय बजरंगबली क्रिकेट संघ आणि बैंजो पथक यांनी आपल्या गावातील शाळेला संगणक संच भेट देण्यात आले. संगणक भेट दिल्यामुळे केंद्राचे केंद्र प्रमुख धर्मा धामणकर यांनी क्रिकेट संगाचे आभार मानले.    कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. प्रकाश घडशी यांनी भूषविले. या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. दिनेश पाडावे, उपाध्यक्ष श्री. शंकर सितप, सल्लागार श्री. सुरेश पाडावे, मुबंई मंडळाचे अध्यक्ष श्री. निलेश सितप, सरचिटणीस श्री. प्रशांत घडशी, श्री. शशिकांत शिगवण, श्री. विशाल शिगवण यांनी मनोगतपर भाषणे केली. त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ, मुबंई मंडळ, महिला मंडळ आणि क्रिकेट संघ यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राठोड सर आणि  श्री. नाईक सरांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा