शेकाप - राष्ट्रवादी मैत्री अभेद्य राहणार - राजिप उपाध्यक्ष ऍड आस्वाद पाटील म्हसळा येथे शेकाप कार्यकारिणी मेळाव्यात प्रतिपादन
घुम - श्रीकांत बिरवाडकर
घुम - श्रीकांत बिरवाडकर
नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रायगड जिल्ह्यत शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेकाप नेते आमदार जयंत भाई पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात एकत्रित पणे निवडणुका लढवून विरोधकांना धूळ चारत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली आणि दोन्ही पक्षाने जिल्ह्यात आपापल्या परीने विकास गंगा आणण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे कोणी किती काही बोलले तरी आगामी काळात देखील शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मैत्री अभेद्य राहणार असून ती कोणीही तोडणार नाही असे प्रतिपादन शेकाप जिल्हा चिटणीस तथा रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी म्हसळा येथे दि.11 ऑगस्ट रोजी पाचगाव आगरी समाज सभागृहात शेतकरी कामगार पक्ष प्रमुख कार्यकारिणी सभेला संबोधित करताना केले आहे.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या समवेत शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख प्रियाताई मुकादम, आरडीसी व्हाइस चेअरमन सुरेश खैरे, जेष्ठ नेते अनंतराव देशमुख, अलिबाग कार्यालयीन चिटणीस परेश देशमुख, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष देवा पाटील, खजिनदार राजेंद्र पाटील, विधी सेल अध्यक्ष सचिन जोशी, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, पंचायत समिती सदस्य छायाताई म्हात्रे, माजी उपसभापती गौरीताई पयेर, तालुका चिटणीस संतोष पाटील, जेष्ठ नेते श्रीपत धोकटे, आरडीसी बँक संचालक तथा सरपंच तुकाराम महाडिक, परशुराम मांदाडकर, तालुका युवक अध्यक्ष निलेश मांदाडकर, विनायक गिजे, राजाराम धुमाळ व संगणक परिचालक संघटना पदाधिकारी व शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच, उपसरपंच व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या समवेत शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख प्रियाताई मुकादम, आरडीसी व्हाइस चेअरमन सुरेश खैरे, जेष्ठ नेते अनंतराव देशमुख, अलिबाग कार्यालयीन चिटणीस परेश देशमुख, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष देवा पाटील, खजिनदार राजेंद्र पाटील, विधी सेल अध्यक्ष सचिन जोशी, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, पंचायत समिती सदस्य छायाताई म्हात्रे, माजी उपसभापती गौरीताई पयेर, तालुका चिटणीस संतोष पाटील, जेष्ठ नेते श्रीपत धोकटे, आरडीसी बँक संचालक तथा सरपंच तुकाराम महाडिक, परशुराम मांदाडकर, तालुका युवक अध्यक्ष निलेश मांदाडकर, विनायक गिजे, राजाराम धुमाळ व संगणक परिचालक संघटना पदाधिकारी व शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच, उपसरपंच व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पातळी व तालुका पातळीवरील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध संघटना व सेल च्या कमिटी गठीत करण्यात आल्या असून यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, अनुसूचित जाती व मागास वर्गीय कमिटी अशा विविध जिल्हा व तालुका कमिटीवर सक्रिय कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली.
आस्वाद पाटिल यांनी पुढे बोलताना सांगितले की म्हसळा तालुका पंचायत समिती मधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असली तरी शेकाप कार्यकारिणी सभेत माझ्या स्वागतासाठी राष्ट्रवादी पक्षाचे सभापती उपसभापती व पंचायत समिती सदस्य हजर राहिले ही आनंदाची बाब असून राजकीय क्षेत्रात काम करताना म्हसळा तालुक्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर तालुक्यांनीही घ्यावा असे सांगितले. तसेच जिल्ह्यात दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यात जसे मैत्री पूर्ण संबंध आहेत तसेच संबंध शेकापचे सर्व तरुण नेते व राष्ट्रवादीचे युवा नेते अनिकेत तटकरे व जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्यात आहेत असे सांगून मागील झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकित म्हसल्यात शेकापचे उमेदवार नसतानाही आघाडी धर्म पाळून शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी युवानेते अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करुन सहाच्या सहा जागांवरील उमेदवार निवडून आणन्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने तालुक्यात विकास कामे करताना जिल्हा परिषद सदस्य तसेच सभापती व उपसभापती यांनी शेकापच्या पदाधिकारी यांनाही विचारात घेतले पाहिजे असे सूचक वक्तव्य केले. आगामी होणाऱ्या लोक सभा व विधान सभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे असे सांगतांना तालुक्यात ऑक्टोबर माहिण्यात होणाऱ्या 14 ग्रामपंचायत निवडणूकीचा आढावा घेतला आणि ग्रामपंचायत निवडणूकित जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला पाहिजे असे आव्हान केले. तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना रस्त्यांवरील खड्डे, ग्रामीण रुग्णालय, दिघी पोर्ट अवजड वाहतूक, विविध कामगार संघटना, विविध लोकोपयोगी कामे करण्यात शासकी अधिकारी वर्गाचा हलगर्जीपणा, कोणत्याही घटकांवर होणारा अन्याय शेतकरी कामगार पक्ष सहन करणार नाही असा रोखठोक इशारा देऊन तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांनी एखादी अन्याय कारक घटना घडली तर तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध नोंदवला पाहिजे अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या विविध मागण्यां पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करुन हा प्रश्न लवकर मार्गी लावणार असे अभिवचन यावेळी उपस्थित म्हसळा तालुका संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले आहे. ग्रामीण भागात गावागावात पक्ष संघटना मजबूत करा आणि पक्षात येणाऱ्यांना मानसन्मान देण्यात येईल. सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घ्या व त्यावर योग्य उपाय योजना करा आणि यासाठी पदाधिकाऱ्यांनी गावागावात फिरून जनतेपर्यंत शेकाप पक्षाची ध्येय धोरणे पोहचवली पाहिजेत असे सांगितले.

Post a Comment