सलाम मुंबई फाऊंडेशन कडून भिकू पांगारकर सन्मानित


      सलाम मुंबई फाऊंडेशन व रायगड जिल्हा परिषद ,अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे  जिल्हास्तरीय तंबाखू मुक्त शाळा उपक्रम कार्यशाळा पेण एज्यु.सोसायटीचे इंग्रजी माध्यम (प्रायव्हेट हाय.पेण )येथे स्मिता पेणकर  - सभापती पं.स.पेण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
       सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सलाम मुंबई फाऊंडेशन व पंचायत समिती श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तंबाखू मुक्त शाळा झाल्या आणि रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यानंतर श्रीवर्धन तालुका तंबाखू मुक्त तालुका ठरला.
       या उपक्रमाकरिता सहकार्य केल्याबद्दल भिकू पांगारकर तालुका समन्वयक तंबाखू मुक्त शाळा यांचा सन्मान सलाम मुंबई फाऊंडेशन वतीने  स्मिता पेणकर - सभापती पं.स.पेण यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा