म्हसळा शहरात राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्म सप्ताहाचा उत्साह शिगेला...

 छाया : सुशील यादव

म्हसळा शहरात राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्म सप्ताहाचा उत्साह शिगेला, शहरातील हिंदू बांधव सात दिवस अखंड श्रीकृष्णाचे करतात नामस्मरण
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा शहरात हिंदू ग्रामस्थ मंडळांच्या माध्यमातून समस्त हिंदू बांधव शहरातील राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्म सप्ताह साजरा करतात. यामध्ये हिंदू समाजातील ब्राम्हण, सोनार, तांबट, कुंभार,शिंपी, साळी, नाभिक. सी.के.पी., भंडारी. परिट ,रोहिदास समाज सहभागी होतात. प्रत्येक समाजाला चोवीस तासातले तीन तीन तास श्रीकृष्णाचे नामस्मरण करण्याची संधी मिळते. असे श्रीकृष्ण जन्मा आधीचे सात दिवस अखंड हा कर्यक्रम चालतो. या श्रीकृष्ण जन्म सप्ताहामध्ये लहान थोर अगदी भक्ती भावाने अहो रात्र सहभागी होतात. अठरा पगड जातीने गठीत झालेले हिंदू ग्रामस्थ मंडळ या कार्यक्रमाचे अगदी सुयोग्य रीतीने नियोजन करते. या सप्ताहादरम्यान एक सेकंद देखील टाळाचा गजर थांबू नये याची काळजी यात सहभागी होणारा भावीक घेत असतो. श्रीकृष्ण जन्माच्या रात्रौ समस्त हिंदू समाजातील बंधू भगिनी राधा-कृष्ण मंदिरात जमा होतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात  भजन कीर्तन केले जाते. नंतर साधारण रात्रौ ११.३० च्या सुमारास श्रीकृष्ण जन्माची पोथी पठण होते. यामधील श्रीकृष्ण जन्म हा प्रसंग वाचताच मंदिरात उपस्थितांकडून भगवान श्रीकृष्णाच्या नावाने जयघोष केला जातो. दुसरा दिवस हा गोपाळकालेचा म्हणजेच दही हंडीचा. शहराची मुख्य हंडी हि म्हसळा शहराचे ग्रामदैवत श्री धावीर देवाची. हि दही हंडी बांधण्यासाठी शहरातील समस्त हिंदू बांधव एकत्रित रित्या कुंभार आळीत जमतात व मुख्य रस्त्यावरून बहुसंख्येने धावीर देव मंदिरात दही हंडी बांधण्या करिता जातात.यामध्ये कुंभार समाजाचा, पेठकर(शिंपी, वैश्य वाणी, मराठा एकत्र) , व गणेश पेठ(तांबट, सोनार समाज एकत्र) असे तीन मुख्य गोविंदे निघतात व शहरातील उंच उंच दही हंड्या फोडण्यात येतात. व सायंकाळी कार्यक्रमाची सांगता होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हिंदू ग्रामस्थ मंडळ , म्हसळा चे अध्यक्ष सुभाष करडे, उपाध्यक्ष नंदकुमार गोविलकर, सचिव सुशील यादव यांच्या समवेत सर्व समाजाचे अध्यक्ष व मंडळाचे सदस्य करतात.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा