कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार....?


घाणेरी कोंड (ताम्हाणे करंबे वाडी) मुलभूत सुविधांपासून वंचीत...
विनायक जाधव
रायगड जिल्हा, श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळे तालुका, म्हणजे मुलभूत समस्यांचे आगर म्हटले तर नवल वाटू नये. तालुक्यातील अनेक गावांत पक्के रस्ते, पाणी आणि वीज या समस्या स्वातंत्र्याच्या  सत्तर वर्षा नंतर येथील नागरीकांना भेडसावीत आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार श्री सुनील तटकरे  श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळे तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असून, दुर्गम भागात वसलेल्या गावांत स्थानिक कार्यकर्त्यांनी भेटी देऊन सहकार्याची जोड देणे आवश्यक आहे.
म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम  भागात वसलेले मु. घाणेरी कोंड,  (ताम्हणे करंबे वाडी) या गावातील रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. हे दृश्य पाहून मनापासून दु:ख व्यक्त करताना येथील गावकरी म्हणतात, "कि माझा गाव कितव्या शतकात वावरत आहे. आज आपण २१व्या शतकात वाटचाल करीत आहोत, पण आमचा गाव १९ व्या शतकात राहिला आहे".
कच्चा रस्ता होऊन २५ वर्ष पूर्ण झाली. पण अजुन किती वर्ष लागतील डांबरीकरण व्ह्यायला...? असा संतप्त सवाल येथील रहिवाशी विचारीत आहेत.  वयोवृद्ध नागरीक आजारी पडले तर खांद्यावर उचलून नेण्याशिवाय  पर्याय नाही. एखाद्या अडलेल्या स्त्रीला उपचारांसाठी कसे न्यावे ...? अशा समस्या भेडसावत आहेत. विभागीय राष्ट्रवादी नेत्यांनी आमच्या समस्या माननीय तटकरे साहेबांपर्यंत पोचवुन मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी या गावच्या ग्रामस्थांची मागणी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा