म्हसळ्यात शिवसेनेला हादरा...संतोष पाखड राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ...


शिवसेना विभाग प्रमुख संतोष पाखड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश, रविवारी पाखड याना शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिर्के कडून झाली होती मारहाण

म्हसळा  : सुशील यादव

म्हसळा तालुक्यातील शिवसेनेला काल अपेक्षेप्रमाणे मोठा हादरा बसला आहे. मेंदाडी विभागात विशेष प्राबल्य असलेल्या शिवसेना विभाग प्रमुख संतोष पाखड यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुतारवाडी येथे जाऊन जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार या वृत्ताचा राग मनात धरून रविवारी( ९ जुलै ) संध्याकाळी ४.०० च्या सुमारास शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिर्के, उपतालुकाप्रमुख अनंत कांबळे यांनी एस.टी. स्टँड जवळ संतोष पाखड यांच्यावर हल्ला चढवत मारहाण केली. याबाबतन म्हसळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये राष्ट्रवादीकडून सपाटून मार खाल्यानंतर म्हसळा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून म्हसळा शिवसेनेमध्ये उभी फुट पडणार असल्याचे संकेत अनेकांकडून मिळत आहेत. या राष्ट्रवादी प्रवेशावर संतोष पाखड यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी थेट शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले “ नंदू शिर्केच्या कार्यशैलीवर अनेक जून नवे शिवसैनिक नाराज असल्याचे चित्र आज तालुक्यात आहे. तालुकाप्रमुख म्हणून आम्हा पदाधिकाऱ्यांना कधीच विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने तालुका शिवसेनेचा कारभार चालवीत असे. नंदू शिर्के तालुकाप्रमुख झाल्यापासून मला नेहमी अनेक निर्णयापासून दूर ठेवले जायचे. मलाच हि माझी पक्षात होणारी घुसमट मी कित्येकदा अनेक वरिष्ठ व पदाधिकाऱ्यांशी बोलून दाखवली होती. परंतु कोणीही माझी दाखल न घेतल्यानेच मला हा निर्णय घ्यावा लागला. ज्याला स्वतः ची खामगाव ग्रामपंचायत जिंकून देता आली नाही तो म्हसळा तालुका काय संभाळणार? असेही तटकरे साहेबांच्या एका भेटीतच मला त्यांच्याबद्दल ऐकलेल्या कार्यशैलीची चुणूक दिसली. म्हसळा तालुक्याचा विकास जर कोणी करेल तर ते तटकरे साहेबच हा माझा ठाम विश्वास बसल्याने व योग्य तो मान सन्मान मिळणार असल्यानेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ माझ्या हातावर घातले आहे व लवकरच माझ्या समर्थकांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आणणार आहे .” असे ते म्हणाले. रविवारी झालेल्या मारहाणीबद्दल पाखाड याना विचारले असता त्यांनी “मला झालेल्या मारहाणीचे पडसाद तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पहावयास मिळतील” एवढेच उत्तर दिले. संतोष पाखड यांची सुनील तटकरे यांनी 'युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,श्रीवर्धन मतदार संघ '  या पदी नेमणूक केली. पाखड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश प्रसंगी आनिकेत तटकरे , जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर , म्हसळा तालूका अध्यक्ष नाझीम हासवारे, जि.प . सदस्य बबन मनवे ,पं.स. सभापती उज्वला सावंत , उपसभापती मधुकर गायकर , अली कौचाली , पं .स. सदस्य संदीप चाचले , छाया म्हात्रे , फैसल गिते , अनिल बसवत , दिलीप कांबळे यांच्या सहीत अनेक म्हसळा तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा