ग्राम पंचायत घुम-रुद्रवट यांच्या विद्यमाने वृक्षारोपण संपन्न...


वृक्ष लागवडी नंतर संगोपण महत्वाचे - तहसिलदार रामदास झळके...
विनायक जाधव , म्हसळा


दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि मानवी चुकांमुळे पर्यावरणात होणारे बदल आणि त्याचे दुष्परिणाम दुर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जनतेच्या सहभागातून 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत सन 2017 चे पावसाळ्यात दि.01 जुलै ते 07 जुलै 2017 या कालावधीत 4 कोटी वृक्ष लावण्याचा महत्वपुर्ण संकल्प केला आहे. या संकल्प पूर्तिकरिता रोहा वनविभागांतर्गत म्हसळा तालुक्यात विविध शासकीय खात्यांमार्फत एकूण 64060 वृक्ष लागवड चे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतुने दि.01 जुलै रोजी म्हसळा तालुक्यातील वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उदघाटन सर्वप्रथम ग्रामपंचायत घुम-रुद्रवट येथे तहसिलदार श्री.रामदास झळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तहसिलदार रामदास झळके यांनी सांगितले की दरवर्षी शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी गावोगावी अनेक प्रकारच्या झाडांची लागवड केली जाते परंतु लागवड केल्यानंतर या झाडांकडे योग्य पद्धतीने लक्ष देत नसून त्यांची काळजी घेतली जात नाही आणि परिणामी या झाडांच्या जगण्याचे प्रमाण खुप कमी होते म्हणून दरवर्षी लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडी नंतर त्यांचे संगोपण करने महत्वाचे आहे असे प्रतिपादन तहसिलदार यांनी घुम येथील कार्यक्रमात बोलताना केले.

तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या मालकी जागेत, गावाच्या सार्वजनिक मोकळ्या जागेत, शाळा, कॉलेज, ग्राम पंचायत कार्यालय व शासकीय परिसर अशा विविध ठिकाणी झाडे लावून त्यांचे आपल्या मुलांप्रमाने संगोपण करण्याचे आव्हान केले. यावेळी उपसभापती मधुकर गायकर, पंचायत समिती विस्तार अधिकारी डी.एन.दिघीकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी घुम येथे राजिप शाळा घुम, होळीचे पटांगण, स्मशानभूमी जागेत आणि रस्त्याच्या दुतर्फा ग्रा.पं. घुम-रुद्रवट मार्फत 400 रोपे व महसुल विभाग मंडळ अधिकारी यांचेमार्फत 50 रोपे मान्यवरांच्या शुभहस्ते लावण्यात आली.

या कार्यक्रमाला तहसिलदार रामदास झळके, उपसभापती मधुकर गायकर, गटविकास अधिकारी निलम गाडे, सरपंच रामचंद्र बिरवाडकर, मंडळ अधिकारी म्हसळा कल्याण देऊळगावकर, खामगाव मंडळ अधिकारी मोरे, तलाठी दिघीकर, तलाठी एस.के.शहा, ग्रामसेवक गुरुनाथ विरकुड, ग्राप सदस्य तथा पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, राजिप शाळा मुख्याध्यापक समिर पाष्टे, शिक्षक जिवन राठोड, अध्यक्ष दिनेश घोले, ग्राप सदस्या श्वेता महागावकर, ग्राप सदस्या दिपिका बिरवाडकर, माजी पोलिस पाटिल धोंडू घोले, माजी उपसरपंच दामोदर महागावकर, पांडुरंग महागावकर, पांडुरंग घोले यांसह घुम-रुद्रवट ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा