म्हसळा पंचायत समितीत कमचारी आॅनड्युटी गैरहजर
-पं० समीतीचा कारभार गतिमान कसा होणार?
- नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते
- कार्यालयात रिकाम्या खुच्या पंखे लाईट चालू
- कमचारी नसतात थाय्रावर नागरिकांची कामे वाय्रावर
- अनेक पदे रिक्त
घुम -श्रीकांत बिरवाडकर
जिल्हा परिषद व गा्मपंचायत यांना जोडणारी मुख्य दुवा म्हणजे पंचायत समिती होय. जिल्हा परिषद मधुन येणाय्रा विविध योजना व त्याचा निधि हा अगोदर पंचायत समिती मध्ये येतो व नंतर तो ॻामपंचायतच्या खात्यावर जमा होतो सावजनिक किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनाचे प्रस्ताव ॻामपंचायत मधुन पंचायत समिती स्थरावर सबंधित खात्याचे अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केले जातात. म्हसळा तालुक्यातील अनेक ॻामपंचायत व महसूली गावातील सरपंच ॻामपंचायत सदस्य किंवा सामाजिक कार्यकतै संबंधित लाभार्थी विविध कामाचे प्रस्ताव घेऊन म्हसळा पंचायत समिती मध्ये येत असतात मागिल काहि महिन्यांपासुन पंचायत समिती कार्यालयात कर्मचाय्रांचे मात्र शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळत असुन म्हसळा पंचायत समितीतील कर्मचारी आँनड्युटी गैरहजर असल्याचे वास्तव चित्र असुन कर्मचारी जरी कार्यालयात कार्यालयीन वेळेत हजर नसले तरी त्यांच्या कॅबिनमधील पंखे,ट्यूब लाईट,कंप्यूटर मात्र चालू ठेऊन कर्मचारी जातात कुठे हा प्रशन नागरिकांना पडतो नागरिक एखाधा प्रस्ताव घेऊन आले तर त्याना पहिल्यांदा कॅबिनमध्ये रिकाम्या खुच्या दिसतात नंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चैाकशी केली असता समजते कि कोण चहा प्यायला गेले तर कोणी मित्राला भेटायेला स्टॅडला गेले तर कधी -कधी काही कर्मचारी कुठल्या तरी हाॅटेलमध्ये बसलेले असतात असे नागरिकांकडुन सागण्यात येते संबंधित कर्मचाय्रांना नागरिकांना फोन लाऊन सागावे लागते की साहेब'''' आम्ही केह़ा पासुन तुमच्या कॅबिनमध्य येऊन बसलो आहोत मग समोरुन उत्तर येतो थाबा येतो दहा मिनीटथांबा येतो पंधरा मिनिटात आॅफिसला मेरे जर कार्यालयात कर्मचाय्रांना चहा मिळतो तर हे कर्मचारी आॅनड्युटी बाहेल का फिरतात अशा कामचुकार कर्मचाय्रांवर गटविकास अधिकारी यांनी वेळीच नियंत्रण ठेवावे. या अन्यथा तालुक्यातील नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पंचायत समिती कार्यालयात महत्वाचे दस्तए्वज असतात तरीही सव्े दरवाजे खिडक्या उघडे ठेऊन हे कर्मचारी बिनधास्त बाहेर फिरत असुन शिपाई देखील वेळेत हजर नसल्याने एखादा दस्तएवज जर गहाळ झाला तर त्यास जबाबदार कोणाला धरणार पंचायत समितीत आधिच कर्मचायांची अनेक पदे रिक्त आहेत परंतु जे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत ते वेळेत हजर नसल्याने नागरिकांना आपला वेळे वाया घालवुन रिकम्या हातनी परत जावे लागते. कधी कधी गटविकास अधिकारी कार्यालयात असतात तेह़ा काही कर्मचारी उपस्थित असतात मात्र गटविकास अधिकाय्राची अनुपस्थितित हेच कर्मचारी कार्यलयात रिकाम्या खुच्याे ठेऊन जातात कुठे हीच परिस्थिति मागील काही महिन्यापासुन सुरु आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समीती निवडणुकीत तालुक्यातील नागरिकांनी राष्ट्रवादी काॅॻेस पक्षाला पंचायत समितीच्या चार ही जागा जिंकुन देऊन एकहाती सत्ता मिळवुन दिली आहे त्यामुळे नागरिकांच सत्ताधारी पक्षाकडुन आणि त्यांचे सभापती. उपसभापती व पं.स.सदस्य यांचेकडुन शासकीय काम गतिमान पद़्धतीने ह़ावे अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे मात्र पं.समितीत कर्मचाय्राचे असलेले शुकशुकाट पाहता विदयमान सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतीनिधी यांचे प्रशासन व कर्मचाय्रा्ंवर अंकूश नसल्याचे दिसुन येते व या सर्व परिस्थितीवर चर्चा करताना नागरिकांमध्ये सध्याच्या परिस्थितीत शासकीय कर्मचारी व लोकप्रतीनीधी यांच्यात ताळमेळे नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सध्याच्या पंचायत समिती कारभारावर प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आहे. कर्मचारी नाहीत थार्यावर त्यामुळे नागरिकांची कामे वाय्रावर असल्याची परिस्थिती मसला पं.समितीत आहे. पं.समितीत आधिच 146 मंजूर पदापौकी 84पदे भरलेली आहेत तर 62 पदे रित आहेत.
Post a Comment