आंबेत शासकीय विश्रामगृहाची इमारत नादुरुस्त
आंबेत प्रतिनिधी (अक्रम झटाम)
सावित्री नदीच्या काठेवर वसलेले अतिशय सुंदर आंबेत गांव या गावाची ओळख या गावाचे सुपूत्र स्व. बॅ. ए.आर अंतुले यांच्या कार्यामूळे संपूर्ण जगात झाली. अंतुले यांच्या कारकीर्दी मध्ये सन 1979 साली आंबेत येथे शासकीय विश्रामगृहाची स्थापना करण्यात आली होती .अतिशय सुंदर इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते.त्या नंतर या इमारतीची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्या देखरेखी खाली चालू आहे. सन 2012 मध्ये या इमारतीचे नूतनीकरण तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या वतीने करण्यात आले होते.
शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे सर्व खांब व भिंतींना तडा गेले आहेत .संपूर्ण टाईल्स उखडलेल्या परिस्तिथीत असून इमारत नादुरुस्त झाल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे.
या बाबत ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक विभाग महाड यांच्याकडे तक्रार केली असल्याचे समजते.


Post a Comment