सावित्री माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न
आंबेत प्रतिनिधी :- सावित्री माध्यमिक विद्यामंदिरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.गुणवंत विद्यार्थ्यामध्ये मराठी माध्यमातून रुक्षिता बाईत ,एकता वाघे ,प्रिया विचारे तर उर्दू माध्यमातून मनार मुशताक हसवारे यांचा समावेश आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शालेय बॅग देऊन गौरविण्यात आले, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत,मित्सुबिशी कंपनीचे जनरल मॅनेजर संजय कुमार दत्तात्रेय कुंभार, अनिल कुंभार,अप्पा विचारे,माजी सरपंच फारुख उभारे, मुफ्ती खालिद, अक्रम झटाम, चंद्रकांत सावंत, मकबूल अंतुले, संदेरी सरपंच फारुख हजवाने,जयवंत सावंत ,अलिमिया रहाटविलकर हाफिज शादाब, मुख्याध्यापक मतीन खान सर आदी मान्यवर उपास्थित होते. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आहे ,सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली
Post a Comment