म्हसळयात आंबेडकरी जनता एकवटली.


म्हसळयात आंबेडकरी जनता एकवटली. माथेफीरु  विशाल दवेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

१४ जून,२०१७, विनायक जाधव

म्हसळे : प्रतिनिधी

सोशियल साइटच्या माध्यमातून तमाम आंबेडकरी अनुयायांबद्दल अपशब्द वापरून भावना दुखावल्याच्या निषेधार्थ; गुजरात मधील; बडोदा शहरातील राष्ट्रीय परशुराम सेवेचा कार्यकर्ता  माथेफिरु विशाल दवे याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून कायदेशीर  कारवाई करण्यासाठी म्हसळे तालुकयातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी रायगड आणि माननीय तहसीलदार म्हसळे यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर माथेफिरू विशाल दवे यानी  सामाजिक ऐक्य बिघडवून; राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणारे व्यक्तव्य केलाने देशभर संताप व्यक्त केला जात आहे. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माथेफिरु युवकावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अन्यथा म्हसळे तालुक्यातील जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

सदर प्रसंगी म्हसळे बौद्धजन पंचायात समितीचे नेते अध्यक्ष आयुः परशुराम साळवी; आयुः स भी पवार गुरुजी; आयुः विठोबा पवार; बौद्ध महासभेचे नेते आयुः संतोष जाधव; आर पी आयचे नेते आयुः राजेश तांबे आणि कार्यकर्ते तसेच तालुक्यातील तमाम भीम अनुयायांच्या उपस्थितीत माननीय तहसीलदार यांना आणि त्यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी रायगड यांना सुध्दा निवेदन देण्यात आले.


* *विनायक जाधव - पत्रकार*

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा