काल खामगाव घ.ल.माध्यमिक विद्यालय खामगाव येथे सेवाभावी संस्था कोकण कट्टा मार्फत मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.या वेळी स्कूल कमिटीउपअध्यक्ष श्री.रामदास खामगावकर,कोकण कट्टा संस्थेचे सदस्य श्री.बाळकृष्ण सावंत साहेब, शाळा व्यवस्थापन सददस्य श्री प्रभाकर बोले,गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन सावंत,महादेव तांबे,रामचंद्र निंबरे,श्री प्रकाश शिर्के (कासारमलै ) व शाळेतील शिक्षक ,विध्यार्थी हजर होते.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री प्रभाकर बोले यांनी कोकण कट्टा संस्थेचे आभार व्यक्त केले त्याच प्रमाणे शिक्षणाचे महत्व विशद करून विधार्थी मित्रांनि खूप शिकून आपल्या गावचे नाव उज्वल करावे आपल्या स्वतःचा आर्थिक स्तर उंच करण्याचा प्रयत्न करावं असे मनोगत व्यक्त केले .तदनंतर खामगाव गावचे समाजसेवक व कोकण कट्टाचे सदस्य श्री बाळ कृष्णा सावंत यांनीहि शिक्षणाचे महत्व आपल्या मनोगतात व्यक्त केले.विधार्थी यांनी परिस्थितीवर मात करून उच्च दर्जाचे शिक्षण घेणे अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेवटी श्री जंगम सर यांनी संस्थे मार्फत कोकण कट्टाचे आभार व शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची समारोप केला.
Post a Comment