म्हसळ्यात एव्हिएशन-हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअर संधींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

म्हसळा – सुशील यादव 

रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे,महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सामाजिक सेवेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स इन सर्व्हिसेस अँड प्लॅनिंग (IESP) यांच्या सहकार्याने म्हसळा येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात एव्हिएशन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअर संधींवर आधारित मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात देवश्री मॅडम आणि पूर्वा सावंत यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील नोकरीच्या विविध संधी,एव्हिएशन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कोर्सेस, प्रशिक्षण पद्धती, आवश्यक कौशल्ये तसेच मजबूत प्लेसमेंट सपोर्ट याबाबत सखोल आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना तज्ज्ञांनी सविस्तर आणि समाधानकारक उत्तरे देत त्यांचा संभ्रम दूर केला.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.दिगंबर टिकळे,प्रा.उमेश लोखंडे,प्रा.शहनवाज उकये यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना एव्हिएशन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअरची स्पष्ट दिशा मिळाल्याने उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा