खारगाव खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर वरील झेंडेत फाडल्याची घटना : पोलिसांकडे तक्रार दाखल

म्हसळा - सुशील यादव 

तालुक्यातील खारगाव खुर्द येथील सकलप परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनरवरील झेंडे काढून ते अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपगण अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन योग्य चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
खारगाव खुर्द सकलप येथे एस.टी. पिकअप निवारा शेडच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे झेंडे व बॅनर लावण्यात आले होते.मात्र दि.७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हे झेंडे बॅनर बोर्डवरून काढून फाडून टाकून परिसरात फेकून दिल्याचे आढळून आले.
गेल्या काही दिवसांपासून गावात अशा स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असून याबाबत ग्रामस्थांच्या सभेत चर्चाही करण्यात आली होती.तरीही अशा प्रकारांना आळा बसलेला नसल्याने नागरिकांमध्ये व पक्ष कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या घटनेमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत कांबळे यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पक्ष झेंडे व बॅनर फाडणे घटनेचे पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा माजी सभापती महादेव पाटील यांनी जाहीर पत्रकाद्वारे निषेध व्यक्त केला असून विरोधकांनी आमचे पक्षाची तुलना विकास कामाची स्पर्धा करताना जन सेवेची काम करून करा असे विक्षिप्त कृत्य करून काही उपयोग होणार नसल्याचे विरोधकांना जाहीर आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा