प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
शिवाजीनगर (चाफेवाडी) येथील ग्रामदेवतेचे आशिर्वाद घेऊन कृष्णा पांडुरंग कोबनाक आपल्या प्रचार कार्याचा शुभारंभ करणार आहेत. गुरुवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे, ज्यामध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे . ग्रामदैवत श्री राधाकृष्णाचे आशीर्वाद घेऊन कोबनाक यांनी आपल्या जन्मगावातून निवडणुकीची सुरुवात करत, जनतेशी भावनिक नातं अधिक घट्ट करण्याचा संकल्प केला आहे.
कोबनाक यांच्या प्रचाराची निवडणूक निशाणी 'बॅट' असून, त्यांचा उद्देश गाव आणि तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या मांडण्यासोबतच त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा आहे. यावेळी कोबनाक यांनी तालुक्यातील व गावातील पदाधिकारी, मित्रपरिवार, तसेच हितचिंतकांना उपस्थित राहून समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, कोबनाक यांनी आपल्या निवडणूक अभियानातून नव्या पिढीला प्रेरणा देत लोकशाहीचा आदर्श राखण्याचा निर्धार केला आहे. आगामी काळात ते आपल्या क्षेत्रात विकासात्मक योजना, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, तसेच शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहेत.
कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत, कोबनाक यांनी या प्रचार कार्यात तालुका आणि गावाच्या लोकांचा मोठा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Post a Comment