कपाला-श्रावधनच्या लकाचा SRD/NRD साठीचा प्रवास...

अभय पाटील : बोर्ली पंचतन 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारे दरवर्षी प्रजासत्ताक दिन परेड शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना विविध निवड चाचणीला सामोरे जावे लागते. सुरवातीला विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय चाचणी होते, मग राज्यस्तरीय ३ दिवसीय निवासी शिबीर आणि अंतिम फेरीत देशांतर्गत विभागस्तरीय १० दिवसाची निवासी शिबीर होतात त्यातून एन. आर. डी. साठीची निवड केली जाते. चाचणीमध्ये शारिरीक, सांस्कृतिक, बौद्धिक, संप्रेक्षण कौशल्य त्याचबरोबर विशेष कला गुणांचा समावेश असतो. विशेषतः स्वयंसेवकाचे परेड मधिल कौशल्य तपासण्यात येते.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठा संचलित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय श्रीवर्धनचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा. सुमित सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वात तृतीय वर्ष बी सी ए या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेली कपोली बोर्ली पंचतन त.श्रीवर्धन येथील कु. साक्षी विजय कांबळे आणि श्रीवर्धन येथील कु. स्नेहा संतोष चौकर महाविद्यालयाच्या या दोन विद्यार्थिनींनी या शिबिरात सहभाग नोंदविला. त्यात कु. साक्षी विजय कांबळे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुर्व रिपब्लिक डे परेडसाठी निवड झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा