कामोठे येथे रायगड जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन


 
 
वार्ताहर:- महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने २८ जुलै २०२४ रोजी राधाई इन्कसॅप स्कूल, कामोठे येथे जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सब ज्युनिअर गट मुले मुली (१० ते १४ वयोगट), ज्युनिअर गट मुले मुली (१४ ते १८वयोगट), सीनियर गट मुले व मुली(१८ ते२८ वयोगट), आणि सीनियर अ गट महिला व पुरुष (२८ ते ३५ वयोगट), सीनियर ब गट महिला- पुरुष (३५ ते ४५ वयोगट), आणि सीनियर क गट पुरुष-महिला (४५ ते ५५ वयोगट) या सहा गटांत स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेत पारंपरिक योगासन, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेयर या प्रकारात स्पर्धा होईल. प्रत्येक वयोगटातील अव्वल तीन स्पर्धकांची निवड संगमनेर येथे १५ ते१८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होईल. सपर्धेविषयी अधिक माहितीकरिता उत्तम मांदारे ८७७९६२८८५१, हेमंत पयेर ९८६०६०१७३६ व सागर सावंत ९८२०९४६५९४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा