महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची साहित्य प्रकाशन अनुदान यादी जाहीर - लेखक वैभव धनावडे ह्यांच्या 'गोष्ट तुझी माझी' लघुकथा संग्रहाची निवड

   महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नेहमीच कामगारांसाठी विविध कामगार कल्याणकारी योजना राबवित असते.कामगार साहित्य चळवळीस प्रेरणा देण्यासाठी साहित्य प्रकाशन अनुदान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी प्रकाशित साहित्य मागविले जाते.प्राप्त पुस्तकांचे परीक्षण करून मग निवडक साहित्यिकांना रुपये दहा हजारांचे मानधन दिले जाते.
यंदा २०२३-२४ वर्षाची साहित्य प्रकाशन योजना अनुदान यादि नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली.त्या अंतर्गत ठाणे विभागातून वैभव दिलीप धनावडे ह्यांच्या "गोष्ट तुझी माझी" पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.वैभव धनावडे हे टेक्नोवा इमॅजिंग सिस्टीम(प्रा).ली येथे अभियंता म्हणून कार्यरत असून साहित्य, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात ते सक्रिय असतात. टेक्नोवा कं मनुष्यबळ विभाग आणि प्रवीण सकट (कामगार कल्याण मंडळ,वर्तक नगर) यांच्या मार्गदर्शनाने सदर अनुदानासाठी प्रस्ताव पाठविणे आणि इतर बाबींची पूर्तता करणे सहज शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.
  वैभव धनावडे ह्यांची 'माझा एकलेपणा' चारोळी संग्रह ,'अक्षर बंध' हायकू संग्रह ही पुस्तके प्रकाशित झाले असून पुढील महिन्यात जगलेल्या कविता आणि नीलाक्षरे हे काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहेत.विविध संस्थांचा पुरस्कार त्यांना साहित्य आणि सामाजिक कार्यासाठी लाभलेला आहे.
   सदर अनुदानाच्या माध्यमातून कामगारांतील लिखाणास नक्कीच प्रोत्साहन मिळून साहित्याच्या माध्यमातून समाजात सृजनता वाढीस लागेल असे मत वैभव धनावडे ह्यांनी व्यक्त केले.समाजातील विविध स्तरांतून आणि विभागांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा