लोकसहभाग व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याने जिजामाता शिक्षण संस्था मराठी शाळेचा खडतर प्रवास सुखकर झाला


सामाजिक दानशूर व्यक्तीमत्व आणि राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याने जिजामाता शिक्षण संस्था मराठी शाळेचा खडतर प्रवास सुखकर झाला  - महादेव पाटील 

म्हसळा - रायगड
तालुक्यातील वरवठणे आगरवाडा येथील जिजामाता शिक्षण संस्था,मराठी माध्यमिक शाळा गेल्या २४ वर्षा पासुन विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत आहे.ग्रामीण भागातील गोरगरीबांचे मुलांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण देता यावे यासाठी शिक्षण संस्थेला नेहमीच आर्थिकदृष्टया अत्यंत खडतर प्रवास करावा लागला. खडतर प्रसंगी संस्था कार्यरत ठेवण्यासाठी सर्व समाजातील दानशूर व्यक्तीमत्व,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केलेली मदत आणि सहकार्यामुळे जिजामाता शिक्षण संस्था मराठी शाळेचा आताचा प्रवास सुखकर झाला असल्याचे मत संस्था प्रमुख माजी सभापती महादेव पाटील यांनी शाळेतील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्याना  भावी वाटचालीस शुभेच्छा देताना व्यक्त केले.शासन कडून चालु वर्षा पासुन २० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याने आता थोड्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.जिजामाता शिक्षण संस्था ही वरवठणे हद्दीत आहे असे असले तरी आगरवाडा ग्रामस्थानी शाळा इमारत बांधकामासाठी गावाची जमीन देवु केल्याने शाळेची मालकी इमारत बांधता आली त्या मुळे संस्थेचे नावात दोन्ही गावांचे नावाचे समावेशन केले असल्याचा खुलासा महादेव पाटील यांनी करताना खासदार सुनिल तटकरे,समाज सेवक तथा रायगडरत्न पुरस्कर्ते कृष्णा महाडीक, अनेक व्यापारी,उद्योगपती,सर्व पक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधी,शिक्षक,विध्यार्थी पालक,शासकीय अधिकारी कर्मचारी आणि सहकारी संचालक मंडळ यांचा सहकार्य लाभला असल्याचे सांगितले.शाळेतील आजी माजी शिक्षकांनी १० वी पर्यंत शिक्षण घेत असतानाचे विद्यार्थ्यांना चांगले अध्यापन व संस्कारीत केल्याने अनेकानी वेगवेगळया क्षेत्रात उज्वल यश संपादन करून जिजामाता शिक्षण संस्थेचे नाव उज्वल केले आहे.शाळेचा १०० टक्के निकाल लागण्याची परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यानी कुठेही न डगमगता यश संपादन करा अशा शुभेच्छा संस्था प्रमुख महादेव पाटील यांनी दिल्या.दिनांक १ मार्च २०२४ पासुन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा सुरु होत आहे त्या पुर्व संध्येला शाळेतील इयत्ता १० मधील विध्यार्थी वर्गाला निरोप समारंभपर शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला संस्था प्रमुख महादेव पाटील यांच्या समवेत प्रमुख पाहुणे उद्योगपती आशपाक खमकर,माजी नगराध्यक्ष तथा संचालक दिलिप कांबळे,संस्था सचिव अशोक काते,प्राचार्य कांबळेकरसर,म्हस्केसर, दिपक म्हात्रे,अंगद कांबळे,अंकुश गाणेकर, लक्ष्मण गाणेकर,विध्यार्थी माता पालक उपस्थीत होते.आयोजीत शुभेच्छा कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, उद्योगपती खमकर,सचिव अशोक काते,प्राचार्य कांबळेकर यांनी विद्यार्थ्यांना १० वी च्या परीक्षेत यशस्वी होऊन पुढे आदर्श नागरीक होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कांबळेकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार म्हस्के सर यांनी केले.निरोप समारंभ प्रसंगी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यानी शाळेला आठवणीत राहील अशी दोन गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडी भेट दिली.शाळेत शिक्षकवृंदान आणि संचालक मंडळाने चांगले अध्यापन करून संस्कारीत केल्याने १० वी परीक्षार्थी विद्यार्थ्यानी मनोगतातून धन्यवाद दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा