ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट : महाराष्ट्रातील 16 संघ होणार सामील

ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट : महाराष्ट्रातील 16 संघ होणार सामील


ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट
महाराष्ट्रातील 16 संघ होणार सामील
संत निरंकारी मंडळाने केले आयोजन

सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने ब्रह्मऋषी व्यासदेव जी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचे 6 आणि 7 मे 2023 रोजी पेण येथील नगरपालिका क्रिकेट मैदान येथे आयोजन करण्यांत आले असून संत निरंकारी मंडळाच्या या क्रिकेट सामन्यांमध्ये महाराष्ट्रातील 16 संघ सामील होणार असल्याचे रायगड झोनचे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.

सदर मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे सुंदरप्रकारे नियोजन करण्यांत आले असून रायगड क्षेत्रातील सेवादल युनिटचे महात्मा जय्यत तयारीला लागले असल्याचे रायगड क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक प्रविण पाटील यांनी सांगितले. यादरम्यान महाराष्ट्रातून झोनल इंचार्ज, क्षेत्रीय संचालक तसेच संयोजक, मुखी महात्मा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी संपूर्ण नियोजन संत निरंकारी भवन पेण येथे करण्यात आले आहे.


या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडू आपल्या युवा शक्तीबरोबरच अनुशासन, मर्यादा व सहनशिलता यांचे सुंदर दर्शन घडवतील, ज्याची आज नितांत आवश्यकता आहे. आज एका बाजूला मनुष्य एकमेकाला केवळ दु:ख देण्याचे काम करत आहे आणि इतरांचे अहित करण्यामध्ये गुंतला आहे, अशावेळी दुसऱ्या बाजूला सद्गुरू माताजी सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन खेळाडू प्रेम व एकोप्याचे जे सुंदर दर्शन घडवतील ते निश्चितच प्रशंसनीय असेल. खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिस्पर्धा, द्वेष किंवा एकमेकाला हीन लेखण्याची भावना दिसणार नाही, या उलट सौदार्ह व शांतीपूर्व सदभावना दिसून येईल. 

सर्व युवकांसाठी दररोज सायंकाळी सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्याचा उद्देश खेळाडूंना शारीरिक स्वास्थाबरोबरच आध्यात्मिक जागृती व मानसिक शांती प्रदान करणे हा असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा