स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटनेचा नववा वर्धापनदिन मोठया उत्साहात संपन्न



स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटनेचा नववा वर्धापनदिन सोहळा मुंबईत जगतगुरू तुकोबारायांच्या गाथेचे नाटक स्वरूपात सादरीकरण करत मोठ्या जल्लोषात सांस्कृतिक दैदिप्यमान सोहळा संपन्न झाला..

संघटना सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य सेवा या ध्येयाने कार्य करत असताना,वारसा समाजकार्याचा, प्रबोधनाचा, शिवकार्याचा जपत नववा वर्धापनदिन सोहळा दैदिप्यमान सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रूपाने "जगतगुरू तुकोबाराय एक क्रांतिकारी योद्धा" ही गाथा नाटक स्वरूपात दि.२० नोव्हेंबर २०२२,रोजी साहित्य संघ मुंबई या ठिकाणी ह्या सोहळ्याच्या निमित्ताने सादर करण्यात आली,त्याचबरोबर ह्या सांस्कृतिक सोहळ्यासाठी सामाजिक-राजकीय नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी, तळागाळातून आलेले सामान्य कुटुंबातील बांधव तसेच मोठया संख्येने तरुण वर्ग यांची उपस्थिती लाभली..
सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने करत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपल्या कलेचं सादरीकरण करत अधिकारी पीएसआय दादा साहेब खुले यांनी "राज आलं..राज आलं.." हे बासुरीच्या सुरात गाणं गायल्या नंतर संघटनेच्या बांधवांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना गीत म्हणत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,

संघटनेचा प्रवास रेकॉर्डिंगच्या माध्यमातून  ऎकवून कार्यक्रमाचा उद्देश प्रास्तविकांतून मांडून विचारमंचावरील उपस्थिती मान्यवरांनी आपले मनोगत मांडत सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर मान्यवरांचे शाल,पुष्गूछ ,पुस्तके देवून विशेष सन्मान करण्यात आले..सोहळ्याच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आले,यांमध्ये भारतश्री पुरस्कारकर्ते सन्मान. सागर कातुर्डे सर आणि सन्मान.परीक्षित कदम साहेब राज्यभिषेक ही प्रतिमा देवून सन्मानित करण्यात आले,

त्याचबरोबर गाव पातळीवर आदर्श गाव पुरस्कार म्हणून तळा तालुक्यातील चोरीवली गाव आणि श्रीवर्धन तालुक्यातील कासारकोंड  गाव या दोन गावांना सन्मानित करण्यात आले...

संघटनेप्रति अनेक वर्षे शिलेदारानें विविध स्थरावर सेवा केली अश्या शिलेदारांना "निस्वार्थी सेवा पुरस्कार" देवून त्यांचे कौतुक करण्यात आले, यांमध्ये तळा तालुक्यातील श्री. रमेश चव्हाण,कु.विक्रम पाजणे, म्हसळा तालुक्यातील कु.निकेश भेकर, मुरुड तालुक्यातील श्री.रत्नाकर बसवत आणि श्रीवर्धन तालुक्यातील कु.साहिल पागडे ह्या शिलेदारांना ह्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.तसेच मान्यवरांनी मिळून संघटनेला देखील संस्थापक,अध्यक्ष,कार्यकर्णी यांना शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले,
 संस्थापक मा. भास्करभाई कारे आणि अध्यक्ष. सचिन आंबवले या दोघांनाही संघटनेची वाटचाल कार्यपद्धती,विचारधारा आपल्या मनोगतात मांडून सोहळ्याची सांगता तुकोबारायांच्या गाथेन झाली,

गाथा नाटक स्वरूपात पहिल्या नंतर गावखेड्या-पाड्यातून, मुंबई सारख्या उपनगरातून आलेली माणसे भारावून गेली,संघटनेचा हेतू प्रामुख्याने समजल्यानंतर सकारात्मक वातावरणाची चर्चा तेथील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर दिसत होती असा हा रांगोळ्या काढलेला नाट्यगृह भगवे फेटे घेतलेले शिलेदार आणि मोठ्या संख्येने उसळलेला जनसागर हा ऐतिहासिक विचारांचा दैदिप्यमान सोहळा मोठया संख्येने संपन्न झाला...

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा