म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील नेवरूळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ.सुरेखा नामदेव काते यांचे दि.08 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 65 व्या वर्षी मुंबई येथे दवाखान्यात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले आहे. गावातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा, शांत व प्रेमळ स्वभावाची महिला अशी त्यांची ओळख होती. त्यांचा बारावा विधी शनिवार, दि.19 फेब्रुवारी रोजी नेवरूळ येथील राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर मुंबई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखदप्रसंगी सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मंडळी तसेच गावातील नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते.
Post a Comment