म्हसळा शहरांत गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली



(म्हसळा प्रतिनिधी)
गानसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकमग्न झाला आसतानाच. सर्वच घटकामध्ये लतादीदींच्या प्रती आदरयुक्त भावना व्यक्त होण्याच्या दृष्टीने या महान गायिकेला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आज गुरवार दि.१०फेब्रु सकाळी ११वा उच्च व तंत्र शिक्षण तंत्रशिक्षण विभागाचे माध्यमातून रुईया महाविद्यालय मुबई येथे सभेचे ना. उदयजी सावंत मंत्री उच्च व तंत्र शिक्षण तंत्रशिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत  आयोजन करण्यात आले. त्या सभेत सार्वजनिक वाचनालय म्हसळाचे पदाधिकारी,कर्मचारी,वाचक सहभागी झाले होते. त्यानंतर वाचनालयांत लतादीदींना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.लताबाई गेल्याने भारतभूमीचा सूर हरपला. सुमधूर शब्दही हरपला, मात्र सुमधूर गीतांच्या माध्यमातून त्या आपल्या सोबत आजन्म रहाणार आहे असे आदरांजली वाहताना शिक्षण विभागाचे दिपक पाटील यानी सांगितले. यावेळी गटशिक्षणअधिकारी मंगेश साळी यानी स्वर्गीय लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आभिवादन केले. आदरांजलीचे कार्यक्रमाला सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,हेमंत माळी,सुनिल गायकवाड,एच.बी.इंदुलकर,  विनोद सोनावणे, ग्रंथपाल उदय करडे, दिपाली दातार, सायली चोगले, अनिल महामुनकर,अशोक बाक्कर, धनंजय सरनाईक,अनिल बेडके, किशोर पैलकर, अ. सलाम कौचाली व अन्य वाचक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा