शिवसेनेच्या वरीष्ठ नेतेमंडळींच्या दुर्लक्षतेने श्रीवर्धन मतदारसंघ विकासासाठी वंचित.



बोर्लीपंचतन ( श्रीनिवास गाणेकर )

रायगड जिल्हा परिषदे मधील सदस्य संख्या ५९, रायगड जिल्ह्यात विधानसभा ७ पैकी २०१४ ला शिवसेनेचे उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले आले तर २०१९ ला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, अलीबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी, खालापुर आमदार महेंद्रशेठ थोरवे असे तीन शिवसेनेचे आमदार निवडून आले मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील श्रीवर्धन मतदारसंघात दुर्लक्ष केल्याने बोर्लीपंचतन गटात राजीनामे सत्र चालू झाली असल्याचे दिसून येत आहे.

श्रीवर्धन मतदारसंघात २०१७ पुर्वी आळीपाळीने रायगड जिल्हा परिषदेच्या जागा निवडून आल्या आहेत, बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेच्या मतदार गटात यापुर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व आता प्रथमच स्वबळावर शिवसेनेच्या  सायलीताई सुकुमार तोंडलेकर निवडून आल्या आणि सहाजिकच शिवसेनेचे कार्यकर्ते, मतदारांना विश्र्वास आला की आपले विभागात आता ख-या अर्थाने थोडाफार विकास होईल मात्र निधी अभावी पदरी निराशा आली असल्याचे श्री. सुकुमार तोंडलेकर यांनी खंत व्यक्त केली.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघात पहिला शिवसेनेचा आमदार श्यामभाई सावंत हे १९९५ साली निवडून आले.विजयाची हँट्रीक झाली. नंतरच्या कालात बोर्लीपंचतन येथील २००५ च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सामान्य शेतकरी कुटुंबातील श्री. तुकाराम सुर्वे निवडून आले आणि उद्धवजी ठाकरे मुंबईहुन तातडीने स्पीड बोटीने श्रीवर्धन मध्ये आले. तेव्हा म्हणाले होते की या मतदार संघानी शिवसेनेची प्रतीस्ठा राखली असल्याने माझे या मतदार संघात विशेष लक्ष असेल हे विसरलेले दिसत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाने श्यामकांत वसंत भोकरे यांनी या बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेच्या गटाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. मध्यंतरीच्या जिल्हा परिषदेच्या गोंधळात त्यांनी फारकत घेऊन शिवसेना पक्ष स्विकारले ते स्थानिक पातळीवर शिवसेना मजबूत आहे म्हणून. २०१७ च्या सार्वत्रिक पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुर्ण ताकदीने काम केले यामध्ये पंचायत समितीवर भगवा फडकविला आणि प्रथमच जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आले यानंतर अनेकदा शिवसेनेच्या समस्त नेतेमंडळी, मंत्री महोदयां पर्यंत पोहचवुनही कोणी लक्ष न दिल्याने मतदारांमध्ये सेनेबाबत नाराजी निर्माण झाल्याने राजीनामे सत्रे चालू झाली असली तरी अद्यापही कोणी लक्ष देत नसल्याने उद्याचे चित्र फार वेगळे असतील यात भविष्य पहायची गरज नसेल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा