संजय खांबेटे : म्हसळा
सर्वत्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसत आसतानाच रायगड मध्ये सोमवार दिनांक ३ रोजी कोरोना रुग्णांनी १०० संख्या पूर्ण केली तर पनवेल मनपात कोरोना रुग्णांची संख्या २१४ अशी जिल्हयात एकूण रुग्णांची संख्या ३१४ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५, मयत १,एकूण कोरोना रुग्ण १२४५, बरे झालेले रुग्ण १,६८,०६६, मयत ४५८९ आहेत.
तालुका निहाय सोमवार दिनांक ३ रोजी मिळालेले नवीन कोरोना रुग्ण पनवेल ग्रामिण ३८,उरण ३, खालापूर ५, कर्जत ५,पेण११, अलिबाग २९, माणगाव१,तळा २ रोहा ४,सुधागड २, श्रीवर्धन, म्हसळा,महाड व पोलादपूर या चार तालुक्यात नव्याने एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याचे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण नियंत्रण कक्षाने प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे.
Post a Comment