बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
आज समाजात आपण आनंदाने फिरतो,वावरतो मनसोक्त खेळतो,बागडतो प्रत्येक गोष्टी अनुभवतो पण काही घटक यातील आनंदापासुन वंचित राहतात.अशा वंचित घटकांसाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात आहेत परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे आपणा सर्वांच्या हातात आहे.आर्थिक मदत अथवा वस्तू साधनांच्या रुपाने ती विशेष गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे व त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे याच कर्तव्यभावनेतुन श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार दि. ४ जानेवारी जागतिक ब्रेल दिनाच्या औचित्याने चौदाव्या वित्त आयोगातुन दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देण्यासह त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे व त्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे या मुख्य उद्देशाने पर्यटन पूरक शीतपेय व्यवसायासाठी पंचविस फ्रिजचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर निसर्ग चक्री वादळात नुकसानग्रस्त झालेल्या अंगणवाड्यांची जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दुरुस्ती व रंग रंगोटी करुन अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना बालपणापासून डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी पाच अंगणवाड्यांना स्मार्ट दुरदर्शन संच भेट देण्यात आले.यावेळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याची प्रामाणिक धडपड करणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी सरपंच उदय बापट,उपसरपंच तृप्ती चोगले,माजी सरपंच व विद्यमान ग्राम पं.सदस्य प्रकाश दातार,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक शंकर मयेकर,सुवर्ण गणेश मंदीर समिती अध्यक्ष महेश पिळणकर,देवेंद्र नार्वेकर, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर पत्रकार गणेश प्रभाळे, सुरेश पांढरकामे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment