बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावणे व जनतेला स्वच्छतेची सवय लागावी या उद्देशाने शासनाकडुन महाराष्ट्रातील गावागावांमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात येते.
गावोगावी हे अभियान राबविल्यामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले आहे.कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे खंडित झालेले हे अभियान शासनाने या वर्षापासुन पुन्हा सुरु केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्हा परीषद गणातील एका गावाची निवड कामाचे मुल्यमापन करुन केली जाते.त्या अनुषंगाने सन २०१९/२० च्या पाहणी अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परीषद बागमांडले गणातील सुंदर ग्राम पुरस्कारप्राप्त दांडगुरी व बोर्लीपंचतन जिल्हा परीषद गणातील सांसद दत्तक ग्राम वडवली या गावांना २७ जानेवारी रोजी रायगड जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड व सहकारी सुनील माळी यांनी भेट दिली.
दांडगुरी गावामधे लोकसहभागातुन व शासनाच्या विविध योजनांतुन वनराई बंधारे,श्रमदानाने बांधलेले जलसंधारण बंधारे स्मशानभुमितील रस्ता,ग्रामपंचायत कार्यालय,पाणी व्यवस्थापन, पाणपोई,पाराचे सुशोभिकरण,सांडपाणी नियोजन,घर व गाव परीसराची स्वच्छता,स्वागत कमान,बसण्यासाठी बाक इत्यादी कामांची पाहणी केली तसेच दलीत वस्तीला सुध्दा भेट दिली.
गावामध्ये लोकसहभागातून, श्रमदानातुन व शासनाच्या विविध योजनांतून झालेल्या विकास कामांबद्दल जयवंत गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासोबत ग्राम विस्तार आधिकारी किशोर नागे,तत्कालीन ग्रामसेवक शंकर मयेकर,सरपंच गजानन पाटील,उपसरपंच दत्तात्रेय पांढरकामे,ग्राम पं.सदस्य जयश्री धांदरुत,प्रगती इंदुलकर,कर्मचारी गीता पवार अंगणवाडी सेवीका वैशाली शिंदे तर वडवली येथे सरपंच प्रियांका नाक्ती,उपसरपंच सुरेश धुमाळ, ग्राम पं.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment