राष्ट्रवादी पक्षाच्याबाले किल्ल्यालाभगदाड ; राष्ट्रवादीच्या कारभारावर नाराजी .
तळा प्रतिनिधी
तळा नगरपंचायत निवडणुकीचा ढोल बडवित असुन ऐन थंडीत वातावरण तापू लागलेआहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अविश्वास दाखवून भूल थापा दिल्याचे लक्षात येताच नाराजी व्यक्त करीत तालुक्यातील तारणे ग्रामस्थांनी एकमताने भगवा खांद्यावर घेऊन दक्षिण जिल्हा प्रमुखअनिलजी नवगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ५५ ते ६० कुटुंबांनीपक्ष प्रवेश केला.या सर्वांचे उपस्थित तालुका प्रमुख प्रधुम्नठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके लिलाधर खातू नमीत पांढरकामे अँड.चेतन चव्हाण,गूरूदास तळेकर ,नरेश सुर्वे, विठोबा चांडीवकर, संजय रेडीज नेहा पांढरकामे, प्रविणा चांडीवकर यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत काळापासून तारणे गांव प्रभाग ९ हा राष्ट्रवादी चा बाले किल्ला समजला जात होता या भागातून अनेकजण निवडणूक लढवून वर्चस्व कायम राखले होते हा इतिहास साक्ष आहे.असे असताना कार्यकर्त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली सेनेने केलेल्या विकास कामावर प्रेरीत होऊन प्रवेश करीत आहोत असे पक्ष प्रवेशकर्त्यांनी मत व्यक्त केले या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली असून शिवसेनेची विजयाकडे घोडदौडच म्हणावी लागेल.सद्यस्थितीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष बिनविरोध जागा झाली आहे.हि विजयाची नांदीच म्हटली जात आहे.
Post a Comment