म्हसळा गटातील नेवरूळ केंद्राची शिक्षण परिषद संपन्न



म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर

दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 ते 05.00 वाजे दरम्यान म्हसळा गटातील नेवरूळ केंद्राची शिक्षण परिषद राजिप शाळा जांभूळ केंद्रप्रमुख श्री.सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
 आयोजित या शिक्षण परिषदेत अनेक शैक्षणिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षण परिषदेसाठी शिक्षण विभागाचे गट साधन केंद्रातील अब्दुस सलाम कौचाली, दीपक पाटील, संदीप भोंकर, नंदकुमार जाधव उपस्थित होते. यावेळी श्री.कौचाली यांनी अध्ययन स्तर बाबत मार्गदर्शन केले तर दिपक पाटील यांनी डायट मार्फत राबविले जाणारे उपक्रम  व इंग्रजी बाबत संदिप भोंकर यांनी शाळा सिद्धी व नंदकुमार जाधव यांनी स्वाध्याय उपक्रमाबाबत सखोल चर्चा करून मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख सुनिल पवार यांनी वेगवेगळे नाविन्यपूर्ण शैक्षणिक विषयांवर योग्य असे मार्गदर्शन करून महत्वाच्या सूचना या वेळी उपस्थित शिक्षक वर्गाला दिल्या. यावेळी शिक्षण परिषेदेसाठी केंद्रातील सगळे शिक्षक उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे औचित्याने यावेळी श्री.खैरे सरांचा 53 वा वाढदिवस साजरा करण्यात आला व शेवटी सगळ्यांचे आभार मानून सभा अध्यक्षांचे परवानगीने सभेची सांगता करणेत आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा