म्हसळा नगरपंचायत निवडणूकभारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ!



(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने ८ उमेदवार उभे केले असून प्रचाराची  आज ग्रामदैवत श्री धावीर देव महाराज यांना श्रीफळ अर्पण करून सुरुवात झाली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले, तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस सुनील शिंदे,सरचिटणीसमहेश पाटील, माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल,महिला तालुका अध्यक्ष  सौ. सुनंदा पाटील,अध्यक्षा महिला सौ. मीना अनिल टिंगरे सर्व व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भाजपाच्या वतीने प्रभाग क्रमांक ०६ मधून संतोष पानसरे, प्रभाग क्रमांक १५ मधून सौ. सरिता पानसरे, प्रभाग क्रमांक मधून सचिन करडे, प्रभाग क्रमांक १६ मधून प्रसाद पोतदार, प्रभाग क्रमांक ०५ मधून सौ.गौरी पोतदार, प्रभाग क्रमांक १७ व १२ मधून शरद चव्हाण, प्रभाग क्रमांक १३ मधून सौ.नंदिनी पवार हे उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. भारतीय जनता पार्टी प्रथमच म्हसळा नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवीत आहे. केंद्रात पंतप्रधान असलेल्या  श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून म्हसळा शहरातील सुजाण जनता भाजपच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करेल अशी आशा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा