म्हसळा नगर पंचायत १७ जागेसाठी ४८ उमेदवार, एक जागा बिनविरोध



राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता.
आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ उमेदवारांचे अर्ज दाखल. 

म्हसळा - प्रतिनिधी 

म्हसळा नगर पंचायतीच्या १७ प्रभागातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी नाम निर्देशन पत्र दाखल करून घेण्याचे ७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शेवटच्या दिवशी एकुण ४८ अर्ज दाखल करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी  सांगितले. उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे प्रक्रियेत विलंब होत असल्याने दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती असे , निवडणूक निर्णय अधिकारी शेडगे यांनी सांगितले.आज शेवटच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ उमेदवार,काँग्रेसचे १०,शिवसेना ६,भाजप आणि शेकाप प्रत्येकी ३ आणि अपक्ष ६ असासमावेश आहे.म्हसळा नगर पंचायतीमध्ये शिवसेना, काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे कट्टर समर्थक व निष्ठावंतांचा सहकार्य घेत स्वबळावर निवडणूक लढवीत आहे.भाजप आणि शेकाप म्हसळा नगर पंचायतीमध्ये काही मोजक्याच जागेवर नशीब अजमावत आहे. बहुतांश प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची सरळ लढत काँग्रेस आणि सेना काँग्रेस युतीमध्ये  होणार असल्याचे पक्षीय बळावरून निदर्शनास येत आहे.प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जाती जमाती महिलां करिता आरक्षित आसुन या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज मंगेश म्हशिलकर यांनी एकमेव अर्ज सादर केला असल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे .राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर बिनविरोध खात उघडुन म्हसळा नगर पंचायतीच्या सत्तेत कायम राहण्याचे शुभ संकेत आहेत.प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसुचित जाती महिलांना आरक्षित असलेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कमळ रविंद्र जाधव तर त्यांचे विरोधात काँगेसच्या कमळी जाधव असे दोन अर्ज दाखल आहेत,प्रभाग क्रमांक २मध्ये ना.मा.प्र.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैष्णवी विश्वास दिवेकर यांचे विरोधात शिवसेनेच्या हर्षदा मोहन किळजे यांच्यात लढत होणार आहे,प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नहेजबीन नदीम दळवी यांचे विरोधात काँग्रेसच्या महिला उमेदवार असे दोन अर्ज दाखल आहेत,प्रभाग क्रमांक ५ सर्व साधारण महिलांना आरक्षित आसुन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नौसीन सलीम चोगले यांच्या विरोधात काँग्रेसह अन्य तीन असे ५उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.प्रभाग क्रमांक६  मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे असल कादरी,काँग्रेसचे जहुर हुर्जुक आणि अन्य एक असे तीन अर्ज दाखल झाले आहेत.प्रभाग क्रमांक७मध्ये ना.मा.प्र.जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे फौवाद उकये,काँग्रेसचे रहीनमानशेख कुरुककर यांनी अर्ज दाखल केले आहेत,प्रभाग क्रमांक ८ मध्ये नामाप्र महिला जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुरा महेश खराडे यांचे विरोधात काँग्रेसच्या शाबाना गणतारे असे दोनच अर्ज दाखल आहेत.प्रभाग क्रमांक ९ मध्ये नामाप्र जागेवर अब्दुलरहीम शाहिद उकये,काँग्रेसचे डॉ. मुविज शेख असे दोन अर्ज दाखल केले आहेत.प्रभाग क्रमांक १० मधील सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुबीन हुर्जुक,काँग्रेसचे सुफीयान हळदे असे दोनअर्ज दाखल केले आहेत.प्रभाग क्रमांक ११ सर्वसाधारण महिला करिता राखीव आसुन तीन अर्ज दाखल आहेत.प्रभाग क्रमांक १२सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आसुन काँग्रेसचे रविंद्र दळवी, राष्ट्रवा दीचे शाहिद जंजिरकर, शेकाप चे जमीर तांबे आणि अन्य दोन असे ५अर्ज दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक १३सर्वसाधारण महिला जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा कविता शितल बोरकर यांचे विरोधात सेनेच्या राखी अजय करंबे अन्य दोन मिळुन ४अर्ज दाखल झाले आहेत.प्रभाग क्रमांक १४मध्ये सर्वसाधारण जागेसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस,अपक्ष एक मिळून ४अर्ज दाखल आहेत. प्रभाग १५मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा जयश्री चंद्रकांत कापरे यांचे विरोधात शिवसेनेच्या नीता प्रसाद बोर्ले,भाजपच्या सरिता पानसरे यांचे अर्ज दाखल झाले आहेत,प्रभाग क्रमांक १६ सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते संजय कर्णिक,शिवसेनेचे राजकीरण खताते,भाजपचे प्रसाद पोतदार असे तीन अर्ज दाखल आहेत. प्रभाग १७ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल शेडगे,भाजपचे भरत चव्हाण आणि अन्य एक असे मिळून तीन अर्ज दाखल आहेत.१७ प्रभागासाठी ४८ उमेदवारानी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.सर्वच प्रभागात विरोधी पक्षांची राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेना काँग्रेस युतीची सरळ लढत होणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्त्यांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी गर्दी केली  होती.उमेदवारी अर्ज भरण्याची किचकट अशी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धती असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब होत असल्याचे विविध राजकीय पक्षांकडून सांगण्यात आले. म्हसळा नगर पंचायत निवडणूक लढविण्यासाठी आज अखेरीस ४८अर्ज दाखल झाले आहेत.निवडणूक अर्ज दाखल प्रकिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेडगे यांना सहा.नि.नि.अधिकारी तथा मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,तहसीलदार समीर घारे, स.पो.नि.उद्धव सुर्वे यांचे सहकार्य लाभले. छाननी बुधवार दिनांक ८.१२.२१ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय येथे होणार आहे असे नि. निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी सांगितले.मा. उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण बाबतीत निकाल राखुन ठेवला असल्याने ओबीसी आरक्षित जागेची छाननी होणार नसल्याचे शेडगे यानी सांगितले. मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर निवडणूक प्रक्रिया छाननी पासून पुढे सुरु होण्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा