म्हसळ्यात आज पहाटे २ते ३ दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा शिडकाव ; आंबा- काजू पिकाला नुकसान



संजय खांबेटे : म्हसळा 
आज पहाटे २ते ३ दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा शिडकाव झाला. तालुक्यात मागील ३-४ दिवस ढगाळ वातावरण होते,अरबी समुद्रा तल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागात विशेषत: कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीला समां तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीयआहे. यामुळे कोकणात पोषक हवामान असल्या ने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
  दिवाळी नंतर उत्कृष्ट थंडी पडत असणा ऱ्या  म्हसळ्यात आज कमाल३४ किमान २६ अंश तपमान रहाणार आहे.अवकाळी पावसामुळे तालुक्यात आंबा- काजू पिकासह रब्बी पिकाचे (वाल, चवळी , मूग व कडधान्य) नुकसान होते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.तालुक्यात काजू पिकाला मोहोर चांगला आला आहे तर आंबा पिकालाही काही दिवसांत मोहोर येण्याची शक्यता आहे. पुढील ३-४ दिवस हवामान ढगाळ रहाणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा