टीम म्हसळा लाईव्ह
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया institute of company secretaries of india (ICSI) कंपनी सेक्रेटरी प्रवेश (Company Secretary entrance exam) परीक्षेचा निकाल १९ नोव्हेंबर ला जाहीर करण्यात आला. या परीक्षेत म्हसळ्याच्या (Raigad News) रेवलीमधील कुमारी निधी महेंद्र टिंगरे हिने 200 पैकी 167 मार्क मिळवत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सीएस परिक्षा काय असते?
भारतातील कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) ही कंपनी सचिवांचा व्यवसाय विकसित आणि नियमन करणारी व्यावसायिक संस्था आहे. सीएसमध्ये पदवी मिळवण्यासाठी तीन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पहिले सीएसईईटी (CSEET)नंतर एक्झिक्युटिव्ह, नंतर प्रोफेशनल परीक्षा पास झाल्यावर सीएस पूर्ण होते.
मुलीच्या यशाने आजचा दिवस कधीही न विसरता येण्यासारखा असून आकाश ठेंगणे असल्यासारखे वाटत आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. - महेंद्र टिंगरे निधीचे वडील.
Post a Comment