संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात आजपर्यंत४०२५मी मी. पाऊस झाला असून.आता परतीच्या पाव साने शेतकरी मात्र धास्तावला आसल्याचे चित्र आहे. हल्ली काही दिवस तालुक्यात सकाळी ९ नंतर कमालीचे उष्णतामान वाढले आहे. आज तालुक्यात सकाळी ९वा.पासून कडक उन्हाचे चटके बसत होते उष्ण तामान ३४अंश सेल्सि अस आद्रता ४२% होती. भातपिके काढणीस (कापणी) परिपक्व झाली आहेत.मात्र सायंकाळी ४ नंतर रोज काही ठिकाणी विजांच्या गडगडा टासह जोरदार पावसामुळे उभे भात पिक शेतात लोळत असतानाचे तालुक्यात चित्र आहे.तालुक्यात२४०० हेक्टर क्षेत्रांत भात , नाचणी ४०० हेक्टर क्षेत्रातं ,वरी सुमारे १०० हेक्टर क्षेत्रांत आहे.काही भागात वरी- नाचणी पिक काढले आहे.असाच कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास भात पिकाला धोका होण्याची जाणकारांची शक्यता आहे.पुढच्या 4,5 दिवसात राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.
"बहुतांश शेतकरी हल्ली फार महाग सुधारीत ,लोकनाथ ५०५ संकरीत जातीची बियाणे लागवडीसाठी वापरतात दिवसभर उन्ह व सायंकाळी पाऊस पडल्यास दाणा ठिसूळ होतो, परिणामीभाव कमी होतो त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते"
पांडुरंग पाटील , प्रगतशील शेतकरी.
"विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा,त्या वेळी घराबाहेर पडू नका, उंच झाडाखाली थांबू नये. त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे हवामान दुपार नंतर संध्या काळी व रात्री पर्यंत असते."
हवामान तज्ञ
फोटो : खरसई भागातील काढणीस (कापणी) परिपक्व भातपिक शेतात पडले आसल्याचे दिसत आहे.
Post a Comment