बाबू शिर्के : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यातील कांदळवाडा येथील किरकोळ किराणा व्यवसायिक दिपक वनगुळे यांच्या निगडी बसस्थानक येथील किराणा दुकानात दिनांक 25 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजताचे दरम्यान छताचे पत्रे काढुन भुरट्या चोराने दुकानातील 4560/-रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती या घटनेची फिर्याद दुकान चालक दिपक वनगुले यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं.70/2021 अन्वये भादवी स.कलम 380,457 नुसार नोंद केली होती. चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू केला असता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आंकेश पांडुरंग पाडावे रा.कांदलवाडा या भुरट्या चोराला दोन दिवसांत नवी मुंबई येथुन ताब्यात घेतले.आंकेश याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचे कडुन चोरलेली सर्व रक्कम म्हसळा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.चोराला पकडून आणणे कामी पोलीस नाईक सुर्यकांत जाधव,पोलीस हवालदार संतोष चव्हाण,प्रकाश हंबीर,राजेंद्र खाडे,विजय फोपसे यांनी यशस्वीपणे काम केले.गुन्ह्या बाबतीत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांचे मार्गदर्शनात पोलीस नाईक सुर्यकांत जाधव हे करित आहेत
Post a Comment