मुंबई-गोवा महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 200 कोटी द्या - खा. सुनिल तटकरे यांची मागणी खासदार सुनिल तटकरे यांची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे मागणी
टीम म्हसळा लाईव्ह
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पहील्या टप्प्याचे काँक्रीटकरण करावे आणि त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांची तरतुद करावी अशी मागणी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. पावसामुळे डांबरीकरण वारंवार उखडत असल्यामुळे ही मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामात खा. तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज पुणे येथील विमानतळावर पवार, गडकरी यांची भेट झाली यावेळी या दोघांमध्ये साकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये गडकरी यांनी या संबधीतांची बैठक बोलावली आहे.
खासदार सुनिल तटकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी, पळस्पे ते इंदापूर या पहील्या टप्प्यातील डांबरीकरण पावसामुळे वारंवार उखडत असल्याचे सागून हा जो रस्ता चांगला आहे तो तसाच ठेवून उर्वरित कामाचे काँक्रीटीकरण करावे, तसेच यासाठी सुमारे 200 कोटीरुपयांची तरतुद करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच इंदापूर ते परशुराम घाटाकडे जाणारा रस्ता आहे. त्यातील कशेडी घाटातील एन्ट्री आणि एक्झीट पॉइंटवरसुशोभिकरणकरावे अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.
Post a Comment