म्हसळा -प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांनी तालुक्यातील शेतकऱ्याना कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिं.१७ सप्टें रोजी सकाळी १०.३० वा. न्यू इंग्लीश स्कुल म्हसळा येथे केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार सुनिल तटकरे भूषविणार आहेत.पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.मेळाव्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले या कृषी विभागाच्या योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आरले पशुसंवर्धन योजना,मत्स्य व्यवसाय कृषि विज्ञान केंद्र किल्ला,रोहा येथील डॉ.माधव गीते ,मधुमक्षिका पालन करणेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील,आळंबी उत्पादनाची माहिती उत्पादक शेतकरी राजेंद्र मोहिते हे देणार आहेत.मेळाव्यात सुधागड पाली येथील प्रगतशील शेतकरी कुमारी रसिका पाठक ह्या त्यांचे अनुभव सांगणार आहेत. तालुक्यातील शेती,खारभूमी विकास, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय,गो-संवर्धन,शेळीपालन, कुक्कुटपालन, फलोत्पादन(आंबा, काजू ,केळी,नारळ, सुपारी लागवड व विकास)मत्स्य व्यवसाय(खाडीच्या पाण्यावरील व निमखाऱ्या पाण्यातील),फळप्रक्रिया, भाजीपाला लागवड,यांचा विकास करुन तालुक्यातील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी ही अपेक्षा स्थानिक शेतकरी शासना कडून बाळगूनआहेत.कोकणातील शेतीत क्रांतीकारी परिवर्तन होतआहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे नोकरीसाठी धावणारा तरुणवर्ग आता कोकणात स्थिरावत असून शेती व्यवसायाकडे वळू लागला आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबल्या जात आहेत.मान्सूनच्या पावसा ची अनिश्चितता यामुळे शेतकरी फळ बाग लागवडीकडं वळताना दिसत आहेत.हीच म्हसळा करांची गरज ओळखून कृषी सभापती बबन मनवे व पंचायत समिती च्या माध्यमातून होणाऱ्या या मेळाव्यातून शेतकऱ्याना फार मोठे मार्गदर्शन होणार आहे.
Post a Comment