महाड पुरग्रस्तांना डॉ.राजेश पाचारकर मित्रमंडळाचा एक हात मदतीचा



। बोर्लीपंचतन । मकरंद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर येथे पूरपरिस्थिती व दरड दुर्घटनेच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तेथील अनेकांचे संसार पुरात उध्वस्त झाले आहेत अनेकांना बेघर व्हावे लागले आहे कित्येकांचे मृत्यु झाले असुन अनेक मृतदेह अजुनही मातीच्या ढिगाऱ्याखाली आहेत.नागरीकांचे दैनंदीन जीवन विस्कळीत झाले असुन स्वतःचे जीव व संसार वाचवण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. या आस्मानी संकटाला तोड देत असलेले नागरीक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत शासकीय यंत्रणेचे काम अविरतपणे सुरुच आहे.परंतु महापुरानंतरची भिषणता इतकी विदारक आहे की येथील संटग्रस्तांना तात्काळ मदतीची गरज आहे. या संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना आपलासुध्दा एक हात मदतीचा मिळावा या सामाजिक जाणिवेने गेली चार वर्षे आपल्या मित्रमंडळाच्या सहाय्याने आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवुन गरीब गरजुंना मदत करणारे श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ.राजेश पाचारकर यांनी आपल्या मित्र मंडळाच्या सहकार्याने महाड येथील पुरग्रस्त गावांत भेट देउन मदतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या बांधवांना पिण्याचे पाणी,दुध,बिस्किटे, सौरदिवे मेणबत्ती,सॕनिटरी नॕपकिन्स, पेपर डिश व कप आदी वस्तुंची मदत करुन आधार देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.यावेळी डॉ.राजेश पाचारकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगीतले की "आमचे हे कार्य म्हणजे सेवाभावी भावनेतुन संकटात असलेल्यांना मदत करण्यासाठी टाकलेलं एक छोटसं पाऊल आहे." अशी असंख्य पाऊलं व हजारो हात पुरग्रस्त कुटुंबांना विविध स्वरुपाच्या मदतीसाठी एकत्र येत आहेत व आपल्या परीने संकटात सापडलेल्यांना मदत पोहचविण्याच कार्य करीत आहेत.
याप्रसंगी डॉ.राजेश पाचारकर मित्रमंडळाचे सदस्य संतोष कांबळे, सचिन परकर,राहुल सातनाक,कौशल वाणी,सुरज कांबळे तसेच पोलादपुर येथील स्थानिक कार्यकर्ते संदेश महाडीक यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा