मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय, वाघेरे, पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय ऑनलाईन अभिनय प्रशिक्षण शिबिरात भावी कलाकारांना मार्गदर्शन करताना अभिनय प्रशिक्षक जगदीश संसारे म्हणाले, जन्मापासून मरेपर्यंत आपण नेहमीच अभिनय करत असतो. नाटक करणे आपल्या सगळ्यांनाच मस्त जमते खास करुन मुलं-मुली तर यात आघाडीवर असतात." संसारेंनी अभिनयाचे दोन प्रकार वाचिक अभिनय आणि आंगिक अभिनय विविध उदाहरणे देऊन आणि अभिनयाची प्रात्यक्षिके करून समजावून दिले. अभिनय प्रशिक्षण संकल्पना अंमलात आणणार्या उपशिक्षिका प्रीतम फिसरेकर यांनी नटसम्राटच्या धर्तीवर सादर केलेल्या 'भांडीसम्राट' या स्वगताने धमाल उडवून दिली.
कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि व्याख्यात्यांची ओळख करून दिली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे, विद्यार्थीनी, पालक, कलाकार उपस्थित होते.
श्रावणी खोत, माधवी पवार, तेजस्वी कांबळे, प्रियंका जोगदंड, आदिती धनावडे, पायल कासारे, आदिती म्हस्के, त्रुतुजा बरकडे, चैताली दहिंबेकर आणि वेदश्री डोंगरे या विद्यार्थिनींनी सदर कार्यशाळेत सहाय्यक अभिनय प्रशिक्षक म्हणून चोख भूमिका बजावली.
कन्या विद्यालयाच्या प्राची खेडेकर, अंशू दराडे, आर्या करंजकर, सुमैया शेख, रेणुका भंडारी, अदिती खराडे, सिध्दी शेटे, जिवंधर हरोले आणि तन्वी फिसरेकर यांनी देखील अभिनयाची झलक दाखवून सर्वांची वाहवा मिळवली.
संसारेंच्या अभिनयाच्या तालमीत तयार झालेल्या अभिनेत्री नमिता पाटील हिने आॉनलाईन पद्दतीने साधलेला संवाद प्रशिक्षणाचा आकर्षण बिंदू ठरला. मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी सहभागी विद्यार्थी, शिक्षक-पालक, प्रितम फिसरेकर, सहभागी कलाकार व मार्गदर्शक जगदिश संसारे यांचे कौतुक केले व उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
Post a Comment