वार्ताहर म्हसळा : रोहा वनविभागातील म्हसळा वनक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती साळविंडे येथील देवळाची वाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . बीटाचे वनरक्षक भीमराव सूर्यतळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व ग्रामस्थांना सांगण्यात आले . सूर्यतळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि वनक्षेत्रपाल निलेश पाटील , परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अनेक उपक्रम राबविण्यात आले . साळवींडे वनव्यवस्थापन समितीला संत तुकाराम वनग्राम जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून याचे संपूर्ण श्रेय साळवींडे वनव्यवस्थापन समिती , ग्रामस्थ आणि वनक्षेत्रपाल निलेश पाटिल , परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांचे असून तालुक्यातील अनेक वनव्यवस्थापन समित्यानांही संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळाले आहेत .
म्हसळा वनक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम
Admin Team
0
Post a Comment