म्हसळ्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढ सुरु आरोग्य यंत्रणेवर येत आहे ताण :कर्मचारी वर्गाची होते ओढाताण.



संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरासह तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात अपुरा कर्मचारी वर्ग व अपुरी यंत्रणा असताना म्हसळा ग्रामिण रुग्णालयात ४५ खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थसेंटर (डीसीएचसी) सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आरोग्यावरील ताण वाढला असून कर्मचाऱ्यांची ओढाताण होतानाचे चित्र दिसत आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्ये चा विस्फोट होऊ लागल्याने आता आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे. मात्र, या यंत्रणेत अपुरे डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी यामुळे सध्या या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. 

ग्रामीण भागातील अपुरी वैद्यकीय साधने आणि एकंदर पायाभूत सुविधा लक्षात घेता इथे कोरोनाला रोखणे हे प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यासाठी एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती ठरत आहे.
म्हसळा डेडिकेटेड कोविड हेल्थसेंटर (डीसीएचसी) साठी वैद्यकिय अधिकारी ३, अधिपरिचारिका ५, औषध निर्माण आधिकारी १, क्ष किरण तंत्रज्ञ १, डाटा एन्ट्री ऑपरेटर किमान २ ची आवश्यकता आहे.

आवश्यक यंत्रसामुग्री 
१)X-Ray मशीन 
२) PSA-BED SIDE CONNECTION WITH HUMIDIFIER, 
३)डायटल मॉनिटर ४, 
४)व्हेंटी लेटर 
५ )A.C. नग ४, 
५) कॉंप्युटर ४ ते ५

अपुऱ्या मनुष्यबळावर सध्या ही यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. ग्रामिण रुग्णालयात नॉनकोविड रूग्णालयाचे डॉक्टर्स हे कोविड रूग्णालयात सेवा देत आहेत. 

"कोरोना महामारीत नागरिकांचे आरोग्य ज्या विभागाच्या हातात आहे, तोच जिल्हा परिषद व राज्य शासनाचे आरोग्य विभाग सध्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा ताप सहन करतोय. आरोग्य विभागावर सध्या कामांचे ओझे वाढलेले असताना सुमारे चाळीस ते पन्नास टक्क्यांवर रिक्त पदांचे ओझे घेऊन आहे ते कर्मचारी रुग्णसेवा करत आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने शासनाने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे"

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा