पेण तालुक्यातील काराव- वडखळ येथील नियोजित ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केली पाहणी
टीम म्हसळा लाईव्ह
पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यासच घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पेण तालुक्यातील काराव- वडखळ येथील नियोजित ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली.
पालकमंत्री कु. आदिती तटकरे या पूर्वी मंजूर झालेली आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय याबाबतच्या विकासात्मक कामांवर धडाडीने लक्ष देत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रांना शासकीय जागा देणे, त्यांचे बांधकाम करणे, या आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून देणे, वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आदी बाबींचा त्या सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
Post a Comment