तळा-किशोर पितळे
तळा तालुका अध्यक्ष कैलासजी पायगुडे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीदक्षिण रायगड जिल्हाध्यक्षअँड. महेश मोहीते यांच्या कडे सादर केला असून स्विकारलाआहे. आता तालुक्याला खंबीर नेतृत्व देणारा पुढचा अध्यक्ष कोण असेल?. कैलासजी नेअचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी राजिनाम्यात वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. तसेच पत्रकारांच्या सहकार्यामुळे समस्यांना न्याय दिला. विकास घडवू शकलो त्यांचे आभार देखील व्यक्त केले. चार वर्षाच्या कारकिर्दीत मात्र पक्ष संघटना बांधण्याचे काम मजबूत करून तालुक्यातील पहीली गिरणे ग्रामपंचायत भाजपची सत्ता आणली हे पक्षासाठी बहुमोल कार्य केले.आणी इतिहास घडवला आहे.तालुक्यात राष्ट्रीय भाजप पक्ष नव्हता असे बोलले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी पक्षाला संजीवनी दिली आहे. पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे पक्षाकडून आलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे विकास कामाची मागणी करून विकास घडवून आणला आहे. शासकीय कमिटी स्थापन करून तालुक्यातील अनेक समस्या मार्गी लावल्य आहेत असेअसले तरी पक्षातील कोणात्या तरी सदस्यांकडून नाराजी केली गेली असावी असा तर्क वितर्क नाक्या नाक्यावर केला जात आहे.त्यामुळे स्थानिक राजकीय पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.नजीकच्या काळात नगरपंचायतीच्या निवडणूक तोंडावर आली असून तालुक्याला आता खंबीर नेतृत्व करणारा पुढचा अध्यक्ष कोण असेल ?असा राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.
Post a Comment