पांडवकालीन देवखोल मंदिराचा तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून विकास करणार
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील जनतेने लोकसभेच्या प्रसंगी भरभरून प्रेम दिले. मोदीच्या तुफान लाटेत मी विजयश्री मिळवली. श्रीवर्धन तालुक्याचा विकास हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून निरंतर लोकसेवा केली. विकास कामांना सदैव भरघोस निधी उपलब्ध करण्यात आला. आगामी काळामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन महाराष्ट्रातील एक नंबरचे अग्रणी पर्यटन क्षेत्र असेल त्या दृष्टिकोनातून मी सदैव प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. दांडगुरी ची ग्रामदेवता सावराई देवी रस्त्याचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रामस्थांनी दांडगुरी हायस्कूल च्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम प्रसंगी सुनील तटकरे म्हणाले श्रीवर्धन तालुक्यात विविध विकास कामांना चालना देत असताना दांडगुरी गावातून सदैव ये जा झाली मात्र कधीही गावात थांबण्याचा योग आला नाही. मात्र ग्रामदेवता सावराई च्या कृपेने तिच्या आशीर्वादाने गावातील विकास कामांना चालना देण्याचा योग आज आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेगळ्या कामांची मागणी केली त्या सर्व कामांची पूर्तता लवकरात लवकर केली जाईल. रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंबहुना पर्यटनाच्या प्रश्न असेल सर्व प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. निसर्ग चक्रीवादळ आणि तौक्ते चक्रीवादळ या दोन्ही नैसर्गिक आपत्ती ने आपल्या तालुक्याचे अतोनात नुकसान केले आहे मात्र रायगडचा खासदार या नात्याने मी श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारकडून राज्याला मदत योग्य मिळाली नाही मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नुकसान ग्रस्तांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. राज्य सरकार ने सर्वसामान्य व्यक्तींना आधार देण्याचे काम केले. नारळ सुपारीच्या बागा असतील किंबहुना इतर शेती असेल त्या सर्वांसाठी पूरक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून मी सदैव राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. माझ्या श्रीवर्धन तालुक्यातील सर्वसामान्य माणूस मोठ्या जिद्दीनं नैसर्गिक आपत्तीशी लढला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम खासदार या नात्याने मी सदैव केले आहे. समाज प्रगल्भ बनला पाहिजे त्याची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना स्थानिक पातळीवर पर्यटनाला बहर कसा येईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. असे सुनील तटकरे यांनी सांगितले. देवखोल हे अतिशय प्राचीन मंदिर आहे सदर मंदिराचा तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार करून लवकरात लवकर राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून विकास साधला जाईल. दांडगुरी हायस्कूल ने मागणी केलेल्या सर्व बाबींची पूर्तता केली जाईल. आधुनिक शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शाळेच्या मागण्या मान्य करून विद्यार्थी वर्गाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून निर्णय घेतले जातील . कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा म्हणजे ज्ञानदानाचे ठिकाण होय. भावी पिढी घडवण्याचं काम शाळेच्या माध्यमातून केले जातं. शाळेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोतपरी सकारात्मक पावले उचलले जातील. असे सुनील तटकरे यांनी सांगितले. राजकीय जीवनामध्ये सदैव जनतेच्या विकासकामांना प्राधान्य देण्याचे काम मी केला आहे. जो सोबत आहे त्याच्याही विकास कामांसाठी आणि जो सोबत नाही त्याच्याही विकास कामांमध्ये मी सदैव आग्रही राहिलो आहे. दांडगुरी गावाच्या रस्त्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी काळामध्ये लवकरच अंतर्गत रस्त्यांसाठी निधीची तरतूद केली जाईल. श्रीवर्धन मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत हक्कासाठी मूलभूत गरजांसाठी व्यक्तीच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे माझं कर्तव्य आहे. सर्व सामान्य व्यक्तीचा विकास हे माझे ध्येय आहे. त्यानुसार मी सदैव प्रयत्नशील आहे.दांडगुरी परिसरात संकल्पित धरण योजना लवकरच मूर्त स्वरूपातील येईल. असे सुनील तटकरे यांनी सांगितले. सदरच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद मेमन तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, उपसरपंच दत्ताराम पांढरकामे, श्रीकांत शेलार प्रदीप पवार व दांडगुरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमामध्ये कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
Post a Comment