दोन महिन्यापूर्वी आपण शिवसेनेच्या कोणत्या नेत्याबरोबर पक्षात येण्यासाठी प्रयत्न केलेत हे उघड करु का..? ; नंदू शिर्के



म्हसळा (वार्ताहर)
शिवसेनेत असताना समीर बनकर याने गद्दारी केली म्हणून शिवसेनेतून हकालपट्टी केली.त्यानंतर राष्ट्रवादी जाऊन तीच परिस्थिती, राष्ट्रवादीतला छोटा कार्यकर्ता सुद्धा समीर बनकरला किंमत देत नाही.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा सुनील तटकरे हे सुद्धा समीर बनकर यांच्यावर नाराज असल्याचे समजते तेंव्हा त्यांनी पाहिले आपले तालुका अध्यक्षपद सांभाळावे नंतरच शिवसेनेवर टीका करावी असे प्रतिउत्तर समीर बनकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना मा तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी दिले.आम्ही कोरोनाच्या काळात तसेच चक्रीवादलाच्या वेळी काय कामे केली ते तालुक्यातील जनतेला माहीत आहे.समीर बनकर यांनी आलेली मदत वाटली कमी ठेवली जास्त हा प्रकार त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून ऐकाला मिळाला.आपण शिवसेनेशी एकनिष्ठ रहिलात नाही तर ज्या पक्षात आहात त्या पक्षात तरी निष्ठेने रहा. दोन महिन्यापूर्वी आपण शिवसेनेच्या कोणत्या नेत्याबरोबर पक्षात येण्यासाठी प्रयत्न केलेत हे उघड करु का..? आणि हो माझ्या वरिष्ठांनी मला पुन्हा तालुकाप्रमुख प्रभारी नेमले आहे त्यामूळे माझी चिंता आपण करु नका.आदरणीय गिते साहेबांच्या माध्यमातून मी जी तालुक्यात विकास कामे केली आहेत त्याची यादी माझ्याकडे आहे त्यामूळे विकास कामांबद्दल  आपण बोलू नये. विकास कामांसाठी मला पालकमंत्री यांना भेटायचे की मुख्यमंत्री यांना भेटायचे यासाठी आपल्या सल्ल्याची आवश्यकता नाही. आपल्याला प्रशासन अजुन शिकण्याची गरज आहे त्यामूळे माझे आव्हान आहे जिल्हा परिषदमधे जाऊन विकास कामाची फाईल फिरवून दाखवा. राहिला प्रश्न पालक मंत्री यांचा प्रत्तेक कार्यक्रमात किती गर्दी आहे याचे पुरावे मी स्वतः पाठवतो मग समजेल मी का अस बोललो ते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा