रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहाला व्हिलचेअर प्रदान



पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

वर्ल्ड बुक रेकॉर्डने सन्मानित केल्याबद्दल रोहेकरांच्या वतीने ना. आदितीताई तटकरेंचे अभीष्टचिंतन

रोहा (वार्ताहर)
रोहे तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांच्या संकल्पनेतून उपजिल्हा रुग्णालय रोहाला व्हिलचेअर प्रदान करण्यात आली.
यावेळी ना. आदिती तटकरे यांनी रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या कामाचे विशेष कौतुक करून क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांच्या झंजावती कार्याचीही प्रशंसा केली.
ना. आदिती तटकरे यांनी कोव्हिडच्या काळात केलेल्या प्रभावी कामाबद्दल नुकतेच त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे गौरवण्यात आले  त्याबद्दल त्यांचा यावेळी रोहेकरांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

यावेळी क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर,प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने,तहसीलदार कविता जाधव,उपजिल्हा रुग्णालय रोहाच्या अधिक्षक तथा रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या मानद सभासद डॉ. अंकिता खैरकर,पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर , गटनेते महेंद्र गुजर,नगरसेवक महेश कोल्हटकर,चंद्रकांत पार्ट,रोटरी सदस्य राकेश कागडा,रूपेश पाटील,निखिल दाते,मनोज बोराणा,विजय दिवकर,शहर अध्यक्ष अमित उकडे,सरपंच उद्देश देवघरकर,युवा नेते निलेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा