भविष्यात शिवसैनिकांना ताकद देणार शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर
टीम म्हसळा लाईव्ह
श्रीवर्धन तालुक्यांतील पाच नवीन ग्रामपंचायतीना, प्राथमिक आरोग्य केंन्द्रांना मंजूरी देणार, त्याचप्रमाणे खार जमीनी विकास या विभागातील विविध विकासकामांचा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील आढावा बैठक आज माणगाव प्रशासकिय ईमारतीमध्ये मुंबई म्हाडाचे सभापती विनोदजी घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद सीईओ किरण पाटील, त्याचप्रमाणे माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा तालुक्यांतील तहसिलदार व प्रांत यांच्या उपस्थितीत पार पडला.
रायगड जिल्ह्यासाठी लवकरच शासनातर्फे पंधरा ॲंबुलन्स, श्रीवर्धन तालुक्यात पाच नव्या ग्रामपंचायत ईमारत, खारलॅंड विभागातून खाडीलगत गावांचा विकासकामे, त्याचप्रमाणे महसूल विभागा अंतर्गत येणार्या वारस नोंद, खरेदी खताची नोंद, ३२ ग या कामांमध्ये होणारी दिरंगाई व शेतकरी बांधवांचा होणारा त्रास, मुद्रांक शुल्क विषयी संबंधी तक्रारी व श्रीवर्धन, दिघी येथील बंदरे, खार जमीन विकास अंतर्गत होणारे विकासकामांचा आढावा माणगाव तालुक्यांतील जलसंपदा विभागाअंतर्गत येणारा भांदरे पूल व पन्हळघर खुर्द हद्दीतील दोन कोसळलेले साकव व इतर रखडलेली विकासकामे मार्गी लावून श्रीवर्धनच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलणार असल्याचे शेवटी अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, मा. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, मा. आमदार तुकाराम सुर्वे, शाम भोकरे, राजीव साबळे, गजानन अधिकारी, प्रतोष कोलथकर, प्रदुम्न ठसाळ, सुकुमार तोंडलेकर, रवी लाड, भाई कांबळे, माणगाव पंचायत उपसभापती सुजित शिंदे, अजित तार्लेकर यांच्यासह श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment