बाबू शिर्के : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या खरसई गावात कोरोना संसर्ग रोखण्यास यश आल्याचे सरपंच निलेश मांदाडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले होते.सध्या खरसई गाव सर्व समाजाच्या पुढाकाराने कोरोना मुक्त झाल्याचे सरपंच यांनी पुढे बोलताना सांगितले.45 वर्षावरील मतदार यादीवाईज लसीकरण करण्याचे जवळ जवळ 75 ते 80% लसीकरण करून उर्वरित नागरिकांचे 100% लसीकरण पूर्ण करू.खरसई ग्रामपंचायत हद्दीत मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा मार्गदर्शनाखाली दोनवेळा लसीकरण करण्यात आले.तसेच गावातील 18 ते 45 आणी 45 वर्षावरील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कमिटी मार्फत ग्रामपंचायत सदस्य यांचा सोबत प्रभावशाली व्यक्तींना सोबत घेऊन लसीचे महत्व पटवून देण्यात आले.गावात घरोघरी कोरोना या रोगाशी कस लढावं याची माहिती देण्यात आली त्यामुळे खरसई ग्रामपंचायत कोरोनामुक्त झाल्याचे निलेश मांदाडकर यांनी सांगितले.
Post a Comment